logo

नांदेड सांगवी येथील क्युरिओसिटी स्कूलमध्ये मराठवाडा मुक्ती संग्रामदिन उत्साहात साजरा...

दि.17
नांदेड सांगवी येथील क्युरिओसिटी स्कूलमध्ये मराठवाडा मुक्ती संग्रामदिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी मा.श्याम पाटील कोकाटे मा.नगरसेवक प्रतिनिधी तथा शिवसेना शहरप्रमुख नांदेड उतर व सर्व मान्यवरांच्या हस्ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर व मुक्ती संग्राम लढ्यातील अग्रणी नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर मा.श्याम पाटील कोकाटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला प्रणाम करून राष्ट्रगित, महाराष्ट्र गित व मराठवाडा गित घेण्यात आले. याप्रसंगी प्रमुख उपस्थिती मा . श्याम पाटील कोकाटे शिवसेना शहरप्रमुख नांदेड उतर, सत्यवान पाटील अंभोरे शिवसेना उपशहरप्रमुख नांदेड उतर , गजानन पाटील कोकाटे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सांगवी प्रभू पाटील कोकाटे, दिगंबर पाटील कोकाटे पालक प्रतिनिधी अशोक पाटील पवार व धनाजी सुर्यवंशी सहसंपादक लोकहित लाईव्ह न्युज चॅनल शाळेच्या संचालिका सौ आशा खिल्लारे, मुख्याध्यापिका अनुराधा काळे व परिसरातील पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. या सर्व मान्यवरांचे पुष्प गुच्छ देऊन उज्वल अकॅडमी व क्युरिओसिटीचे संचालक प्रा.माधव खिल्लारे यांनी स्वागत करुन कार्यक्रमाला उपस्थित तथा सांगवी परिसरातील सर्व पालकांना मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या व आपले सहकार्य असेच लाभो असे आव्हान केले . यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री.श्याम पाटील कोकाटे यांनी प्रा.माधव खिल्लारे यांच्या कार्याचे कौतुक केले व क्यूरिओसिटी स्कुल एक आपल्या पाल्याच्या सर्वांगिण विकासासाठी सर्वोतोम पर्याय असल्याने सांगवी परिसरातील जास्तीत जास्त पालकांनी आपल्या पाल्याचा प्रवेश क्युरिओसिटी स्कूलमध्ये करावा असे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्कूलच्या शिक्षिका नेहा मिस, अंजली मिस, संजना मिस व चवणे मावशी यांनी परिश्रम घेतले.

57
2233 views