Aima media jan jan ki avaj दिनांक : 15/09/2025 4:28 पाम मुंबईकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो-३ चा अखेरचा टप्पा दसऱ्याला सुरू होणार? संपूर्ण मार्गावर २७
Aima media jan jan ki avaj दिनांक : 15/09/2025 4:28 पाम मुंबईकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो-३ चा अखेरचा टप्पा दसऱ्याला सुरू होणार? संपूर्ण मार्गावर २७ स्टेशन, कुठे असणार थांबा?Mumbai Metro - 3 Aqua Line Dussehra Launch : मुंबईत मेट्रो-3 दसऱ्याला संपूर्ण सुरू होणार असल्याची माहिती आहे. या मेट्रो-3 च्या मार्गावर एकूण 27 स्टेशन्स असतील. जाणून घ्या कुठे-कुठे थांबणार मेट्रो-3.मुंबई : मुंबईकरांना प्रवासाचा महत्त्वाचा मार्ग मेट्रो-३ अर्थात ॲक्वा लाइनबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. दसऱ्याच्या मुहुर्तावर मुंबईकरांच्या सेवेत मेट्रो - ३ दाखल होणार आहे. म्हणजे दसऱ्याच्या दिवशी मेट्रो लाइन - ३ कॉरिडोर संपूर्ण सुरू होईल. मेट्रो - ३ चा वरळी आणि कफ परेडदरम्यानचा अखेरच्या टप्प्याचं रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी नुकतीच पाहाणी केली होती. या पाहणीनंतर मेट्रो - ३ दसऱ्यापर्यंत सुरू होईल अशी घोषणा करण्यात आली आहे.पहिली भूमिगत मेट्रोॲक्वा लाइन ही मुंबईत पहिली भूमिगत मेट्रो आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ३३.५ किमी लांबीचा कुलाबा-आरे कॉरिडॉर सप्टेंबरच्या अखेरीस किंवा ऑक्टोबरच्या सुरुवातीला प्रवाशांसाठी खुला केला जाईल.मेट्रो - ३ दसऱ्याला सुरू होणार?मेट्रो - ३ लाइनचं दोन टप्प्यात काम करण्यात आलं आहे. पहिल्या टप्प्यात आरे ते बीकेसी या मार्गाचं ७ ऑक्टोबर २०२४ रोजी उद्घाटन करण्यात आलं. तर बीकेसी ते वरळी या मार्गाचं ९ मे २०२५ मध्ये उद्घाटन झालं होतं. आरे ते बीकेसी आणि बीकेसी ते वरळी हे दोन्ही मिळून आता संपूर्ण मेट्रो-३ लाइन दसऱ्याच्या मुहुर्तावर सुरू होण्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.मेट्रो - ३ साठी जवळपास ३७००० कोटी रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती आहे. मेट्रो - ३ साठी या संपूर्ण मेट्रो - ३ मार्गावर म्हणजेच कफ परेड ते आरे कॉलनीपर्यंत २७ स्टेशन्स असतील. मुंबईतील हा पहिला आणि एकमेव संपूर्ण अंडरग्राऊंड मेट्रो कॉरिडोर आहे. या लाइनवर २७ पैकी २६ स्टेशन्स अंडरग्राऊंड आहे. ऑगस्ट २०२५ मध्ये हा मार्ग सुरू होणार होता. मात्र आता दसऱ्याच्या मुहुर्तावर पूर्णपणे सुरू करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.सध्या मेट्रो लाइन - ३ कुठे सुरू?मुंबई मेट्रो - ३ सध्या आरे आणि वरळीदरम्यान सुरू आहे. या दरम्यानचा २२.४६ किमीचा मार्ग सध्या सेवेत आहे. त्यानंतर यंदा एप्रिलमध्ये मेट्रो-३ च्या १०.९९ किमी या अखेरच्या टप्प्यासाठी ट्रायल रन करण्यात आली होती. आता दसऱ्याला हा अखेरचा टप्पा सुरू होईल. हा टप्पा पूर्ण झाल्यानंतर कुलाबा, वरळी, सांताक्रूझ या मार्गांवर प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. याशिवाय देशांतर्गत विमानतळांना जोडणारी ११ अतिरिक्त स्थानकं या मार्गाशी जोडली जातील. मेट्रो लाइन - ३ सुरू झाल्याने अनेक प्रवाशांना प्रवासासाठी, वाहतुकीसाठी एक चांगला पर्याय उपलब्ध होऊन मोठा फायदा होणार आहे.मेट्रो - ३ स्टेशन्स कुठे?- आरे कॉलनी- सीप्झ- MIDC- मरोळ नाका- CSMIA T2- सहारा रोड- CSMIA T1- सांताक्रूझ- विद्यानगरी- बीकेसी- धारावी- शितलादेवी मंदिर- दादर- सिद्धिविनायक मंदिर- वरळी- आचार्य अत्रे चौक- विज्ञान संग्रहालय- महालक्ष्मी- मुंबई सेंट्रल- ग्रँट रोड- गिरगाव- काळबादेवी- CSMT- हुतात्मा चौक- चर्चगेट- विधान भवन- कफ परेड