logo

"आमदार भीमराव केराम यांचा बंजारा समाजाच्या (ST) आरक्षणाला तीव्र विरोध"

[14/09, 10:00 pm] Adv. Shivraj Rathod: "सरकारला आमदाराचा इशारा"
"बंजारा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला विरोध व निर्णय असे घेण्यास भाग पाडले की,राज्य व आदीवासी सल्लागार परिषदेची बैठक व सर्व आदीवासी आमदार, खासदारांना या बाबत अवगत करावी त्या नंतर मूळ आदिवासीना न्याय देण्याचा इशारा आपल्या निवेदनाद्वारे कळविण्यात आले आहे."
[14/09, 10:15 pm] Adv. Shivraj Rathod: म्हणूच किनवट /माहूर विधानसभा मतदारातील बंजारा समाज सध्या एसटी (अनुसूचित जमाती) प्रवर्गातील आरक्षण मिळवण्यासाठी आक्रमक आंदोलन करत आहे, आणि विविध ठिकाणी नाराजी वेक्त करत त्यांनी आमदार साहेबांना थेट इशारा दिला आहे की समाजाच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर मोठे आंदोलन केले जाईल?..समाजाच्या मागण्या आणि आंदोलनाचा कारण
बंजारा समाजाची प्रमुख मागणी म्हणजे हैदराबाद गॅझेटनुसार एसटी प्रवर्गात तातडीने समावेश करावा.बंजारा समाजाचा असा दावा आहे की, इतर राज्यांमध्ये त्यांना एसटी आरक्षण मिळते, त्यामुळे महाराष्ट्रातही तेच लागू करावे.राज्यभरात जालना, बीड, नागपूर, पालघर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मोर्चे, रास्ता रोको, आमरण उपोषण इ. आंदोलन सुरू आहेत.बंजारा समाजाने आमदार साहेबांना निवेदन देऊन "आमच्या मागण्या पुर्ण न झाल्यास पुढील निवडणुकांत विरोध करू" अशी स्पष्ट भूमिका घेतली आहे.15 सप्टेंबर आणि 17 सप्टेंबर रोजी मोठ्या मोर्चांचे आयोजन आहे, आणि मुंबई "जाम" करण्याचा इशारा नेत्यांनी दिला आहे.धनंजय मुंडे, विजयसिंह पंडित सारखे काही आमदार बंजारा समाजाच्या मागण्याला पाठिंबा देत आहेत.परंतु समाजाचा आरोप आहे की, अजून अनेक आमदार व खासदार त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहेत, त्यामुळे त्यांच्यावर दबाव आणण्यासाठी बंजारा समाज एकत्र होत आहे.बंजारा समाज सरकार व आमदार साहेबांवरील अपेक्षित निर्णय न झाल्यास सार्वजनिक आंदोलना व निवडणुकांमध्ये विरोध यांसारखी पावले उचलण्यास तयार झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

24
1898 views