
तेलंगणा महाराष्ट्र सीमावर्ती भागातील सोनुर्ली गावात खेळतात तीन पत्ता, कट्टा, रमिवर लाखोचा जुगार, प्रशासनाचे दुर्लक्ष
Aima Media News chandrapur
राजुरा : तालुका अंतर्गत येणाऱ्या सोनुर्ली गावात क्लबच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर सट्याचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तीन पत्ता, कट पत्ता, रमी अशा पत्त्यांच्या आधारे जुगार खेळ खेळवले जात असून, रोज लाखों रुपयांची उलाढाल होत असल्याचे समोर आले आहे.
दररोज दुपारी चार वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत हा अवैध धंदा बिनधास्तपणे सुरू असतो. यामध्ये तेलंगणा व आंध्र प्रदेशातून मोठ्या प्रमाणावर लोकांची जमवाजमव होत असून, परिसरात अनैतिक वातावरण तयार झाले आहे. या धंद्यामुळे लहान मुलं, तरुण पिढी चुकीच्या मार्गावर जाण्याची शक्यता असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे गावकरी प्रशासनाकडे सातत्याने कारवाईची मागणी करीत आहेत. मात्र, अद्याप संबंधित शासकीय विभागाकडून दुर्लक्षच होत असल्याचे चित्र दिसत आहे.
गावकऱ्यांनी या संदर्भात सांगितले की, "यापुढे अशा प्रकारच्या अवैध धंद्यांना गावात स्थान दिले जाणार नाही. लवकरात लवकर पोलिसांनी कारवाई करून क्लब बंद करावा, अन्यथा आम्हाला तीव्र आंदोलन उभारावे लागेल." गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी देखील आवाज उठवत प्रशासनाला आवाहन केले की, युवकांच्या भवितव्यासाठी सट्याचा व्यवसाय रोखणे गरजेचे आहे.