logo

बाल संगोपन योजनेच्या सर्व पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवून देणार -शत्रुघ्न कांबळे

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय तपकिरी शेटफळ संचलित महिला व बालविकास विभाग मान्यता प्राप्त"" क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना ""कार्यशाला संपन्न .
पंढरपुर तालुक्यातील बाल संगोपन योजना या विषई माहिती देने साठी डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय संचालित महिला व बाल विकास विभाग ,मान्यता प्राप्त क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना तिल सर्व पात्र विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व लागणाऱ्या सर्व कागदपत्रांच्या माहिती देण्यासाठी पंढरपूर येथे या कार्यशाळेचे आयोजन पंढरपूरचे माजी सभापती राजेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली .
याप्रसंगी कांबळे सर यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणामध्ये त्यांच्या संस्थेमार्फत करण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रम व समाज उपयोगी योजनेच्या राबवल्या जाणाऱ्या सर्व योजनांची माहिती दिली
याप्रसंगी त्यांनी सांगितले की पंढरपूर तालुक्यातील एक ही पात्र विद्यार्थी या योजनेपासून दूर राहू देणार नाही यासाठी मी माझे सर्वतोपरी प्रयत्न करीन या संस्थेमार्फत 200 विद्यार्थ्यांचे फॉर्म भरले होते त्यापैकी 188 विद्यार्थ्यांना निधी मिळवून देण्याचे काम या संस्थेमार्फत करण्यात आले या संस्थेचे हे काम महाराष्ट्रामध्ये एक नंबरचे आहे, राहिलेले विद्यार्थ्यांचे कागदपत्रे अपूर्ण असल्यामुळे त्यांना निधी आला नाही या कागदपत्रांची पूर्तता पूर्ण करून घेऊन त्यांनाही निधी मिळवून देणारच असे त्यांनी सांगितले. तसेच 200 विद्यार्थ्यावरून 400 विद्यार्थी पर्यंत टार्गेट पूर्ण करणार असे सांगितले.
याप्रसंगी राजश्रीताई यांनी या संस्थेच्या कामाचे कौतुक करून या या योजनेचे पूर्ण माहिती दिली व भविष्यामध्ये कोणतेही कामासाठी मदत करण्याचे मान्य केले
या कार्यक्रमासाठी श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे संचालक तानाजी वाघमोडे, सामाजिक कार्यकर्ते सुधाकर कवडे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्ष राजश्री ताड, पालक प्रतिनिधी गाजरे सर व मोठ्या संख्येने पात्र विद्यार्थ्यांचे पालक हजर होते
याप्रसंगी विविध क्षेत्रांमध्ये यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला तसेच पालकांचाही सन्मान करण्यात आला.
यावेळी पालक प्रतिनिधी म्हणून सोनाली घुले यांनी आपले विचार व्यक्त केले व त्यांनी या कामासाठी समाधान व्यक्त केले या संस्थेची मुळेच आमच्या विद्यार्थ्यांना अनुदान मिळू शकले अशी त्यांनी भावना व्यक्त केली
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतुल सटले सर यांनी केले व आभार संजय गाजरे सर यांनी मानले.

56
4943 views