logo

*स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नांदुरा तालुका अध्यक्ष चरणसिंग राजपूत यांचे तहसीलदार यांना निवेदन*

*स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नांदुरा तालुका अध्यक्ष चरणसिंग राजपूत यांचे तहसीलदार यांना निवेदन* नांदुरा तालुक्यातील अनेक गावांमध्ये एप्रिलमध्ये बेमोसमी पाऊस व चक्रीवादळाने मका,हायब्रीड,अनेक फळबागांचे व घरांचे अतोनात नुकसान झाले होते शेतकऱ्यांना व घरे पडझड झालेल्यांना मदत देण्यात यावी अशी मागणी स्वाभिमानी चे तालुका अध्यक्ष चरणसिंग यांनी केलेली आहे त्यांनी म्हटले आहे रब्बीच्या हंगामात लागवड केलेली पिके एप्रिल महिन्या मध्ये चक्रीवादळ व बेमोसमी पाऊसामुळे मका,हायब्रीड, हरबरा पिके जमीनदोस्त झाले होते सन,2024,2025 रब्बी मध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात मका, हायब्रीड, हरबरा या पिकांची शेतामध्ये मोठ्या प्रमाणात लागवड केली होती पण अचानकपणे एप्रिल महिन्या मध्ये चक्रीवादळ आल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील पिके हे पूर्णपणे जमीनदोस्त झाले होते व शासनाच्या माध्यमातून शेतातील नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे देखील केले होते तर काही सामान्य लोकांच्या घरांचे देखील या मध्ये नुकसान झाले होते काहींचे घरांच्या भिंती पडल्या होत्या तर काहींचे टिनपत्रे उडून गेले होते त्यांचे देखील पंचनामे शासनाच्या वतीने करण्यात आले होते मात्र पंचनामे होऊन चार ते पाच महिने उलटून गेली मात्र अद्यापही शेतकऱ्यांना व घरे पडझड झालेल्या घर मालकांना कुठल्याही प्रकारची मदत मिळालेली नाही राज्य शासनाने या साठी निधी देखील उपलब्ध केलेला आहे तरी सुद्धा मदत मिळत नाही हे दुर्दैव आहे स्थानिक प्रसनाने तहसिल व कृषी कार्यलया मार्फत हा निधी वितरित करावा पंधरा दिवसाच्या आत अनुदान शेतकऱ्यांच्या व घरांच्या पडझड झालेल्या घर मालकांना अनुदानाची मदत लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष चरणसिंग राजपूत यांच्या कडून करण्यात आली आहे.

21
893 views