logo

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे राज्यस्तरीय पहिले अधिवेशन संभाजीनगर येथे

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संचलित डिजिटल मीडिया परिषदेचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन संपन्न होणार
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संचलित डिजिटल मीडिया परिषदेचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन रविवार, दि. १४ सप्टेंबर रोजी संभाजीनगर येथील संत एकनाथ रंगमंदिरात आयोजित करण्यात आले आहे.
या अधिवेशनात युट्युब चॅनल व पोर्टलचे संपादक व चालक यांना उपयुक्त माहिती मिळणार असून डिजिटल माध्यमातील पत्रकारांना संरक्षण व शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न होणार आहेत.
पत्रकारांनी या अधिवेशनात सहभागी होऊन आपली एकजूट दाखवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या अधिवेशनाचे मार्गदर्शन अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख, विश्वस्त किरण नाईक, शरद पाबळे तसेच अध्यक्ष मिलिंद आठवले करणार आहेत.
डिजिटल मीडिया परिषद पुणे जिल्हा अध्यक्ष भारत निगडे यांनी सर्वांना वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. ✅

12
411 views