
श्री बाप देव शिक्षण संस्था रासे द्वारा संचलित श्री रेणुका माध्यमिक विद्यालय रासे येथे ओळख ज्ञानेश्वरीचा उपक्रम बक्षीस वितरण सोहळा संपन्न
रासे- दि.११सप्टेंबर २०२५ रोजी श्री बापदेव शिक्षण संस्था द्वारा संचलीत श्री रेणुका माध्यमिक विद्यालय रासे व श्री ज्ञानेश्वर चरित्र समिती यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक वर्ष २०२४/२५ मध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरी अभ्यासक्रमावर आधारित झालेल्या परीक्षेत यश मिळविणारे गुणवंत विद्यार्थ्यी यांचा सन्मान सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरूवात संत ज्ञानेश्वर माऊलींची प्रतिमा पूजनाने झाली.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.ह.भ.प.संतोष महाराज सांगळे होते.यावेळी संत ज्ञानेश्वर चरित्र समितीचे अध्यक्ष श्री प्रकाश काळे, विश्वंभर पाटील, पत्रकार अर्जुन मेदनकर,रोहिदास कदम,बापदेव शिक्षण संस्थेचे सचिव दिपक मुंगसे सर, उपाध्यक्ष वामन मुंगसे, संचालक नवनाथ शिंदे,
विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुवर्णा बोर्हाडे,संजीव भोर, संजयकुमार पिचके, संतोष काळे, कल्पना गायकवाड, अंजली झिंजुरके, शारदा मुंगसे आदी मान्यवर उपस्थित होते. संस्था सचिव दिपक मुंगसे यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांनी जीवनात कसे जगावे, पालकांशी कसे वागावे, भविष्याचे भान ठेवून स्वतःची प्रगती करावी असा संदेश त्यांनी दिला. यावेळी गुणवंत विद्यार्थी समीक्षा सोमनाथ वाडेकर , रिया सतिश कुटे, सदिच्छा सचिन डावरे, वैष्णवी गणेश डावरे, स्वरांजली हनुमंत मुंगसे, प्राची भास्कर मंडपे या विद्यार्थ्यांना बक्षिस व गौरवचिन्ह देवून सन्मानीत करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्पना गायकवाड यांनी केले तर आभार संतोष काळे यांनी मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.