
*आरोग्य मंत्र्याच्यासह झालेल्या बैठकी नंतर शासनानं मागण्या मान्य;आरोग्य कर्मचाऱ्यांचा संप संपुष्टात-जल्लोषात विजयघोष!*
*“आंदोलनाला यश, कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य”*
*आरोग्य कर्मचाऱ्यांचा संप मिटला; आज पासून पुन्हा सर्वांनची सेवेत रुजू...*
जव्हार प्रतिनिधी:-
पालघरपासून ते पुण्यापर्यंत, ठाणेपासून ते नागपूरपर्यंत राज्यभरात तब्बल २३ दिवसांपासून गाजत असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपावर अखेर विजयाची मोहर उमटली. आरोग्य मंत्र्याच्यासह झालेल्या बैठकी नंतर शासनानं मागण्या मान्य करताच आंदोलनकर्त्यांनी “जय आरोग्यसेवक”च्या घोषणा देत संप मागे घेतला.
आरोग्यसेवकांच्या वेतनवाढ, बदली धोरण, विमा सुविधा अशा मुद्द्यांवर अनेक दिवसांनी गाठ पडलेल्या चर्चेत तोडगा निघाल्याने कर्मचारी आनंदात नाचले. आंदोलनस्थळावर डफली, टाळ, ढोलकी वाजताच संपकरी कामगारांच्या चेहऱ्यावरचे ताण-तणाव विरघळले आणि विजय जल्लोष फुलला.
“लढलो आम्ही, झगडलो आम्ही, शेवटी जिंकलो आम्ही” अशी हाक देत संघटनांनी सरकारसमोर हक्क मिळवला. आता सेवेत परतताना, “जनतेची सेवा हीच खरी पूजा” अशी हाक देत कर्मचाऱ्यांनी पुन्हा रुग्णालयात रुजू होण्याची तयारी दाखवली.
आरोग्य कर्मचाऱ्यांचा संप संपुष्टात आज पासून सर्वांनची कामावर उपस्थित...
संपामुळे निर्माण झालेला तणाव आणि आरोग्य सेवेतील गोंधळ आता हळूहळू निवळणार असला तरी, या विजयामुळे कर्मचाऱ्यांचा आत्मविश्वास दुणावल्याचं चित्र स्पष्ट दिसत आहे.
आपले संविधान हीच खरी आंदोलनाची ताकद एकजूट, लढले आणि शेवटी यश! मिळालेच.