logo

सोलापूर पालकमंत्र्यांचा ये-जा करणारा रोड बनलाय मृत्यूचा सापळा..!

सातारा पंढरपूर रस्त्यावर माण तालुक्यातील धुळदेव गावच्या हद्दीत अर्धवट झालेले रस्त्याचे काम तसेच उकरून ठेवलेला रस्ता आणि अर्ध्यात बांधलेला नवीन पूल यामुळे रस्त्यावर वाहतूक करताना मोठ्याप्रमाणात धोक्याचा अपघातांचा सामना या रस्त्यावरील वाहन चालकांना तसेच स्थानिक नागरिकांना करावा लागत आहे.
पावसात तर हा रस्ता आणखीनच भयानक होतो चिखल आणि गुढग्या इतके खोल खड्डे अन् त्या खड्यात साचलेल्या पाण्यामुळे वाहन चालकांना खड्ड्याचा अंदाज येत नाही व अपघात घडतात. या ठिकाणी अनेक प्रवाशांच्या जीवितास धोका झालेला आहे. परंतु सदर रस्तावर कोणतेही उपाय केले जात नाहीत. प्रशासन रस्ते कॉन्ट्रॅक्ट देऊन रिकामे झाले आहे. प्रत्यक्षात काम कसे चालू आहे किंवा काय प्रगती आहे. याकडे लक्ष द्यायला बहुधा कोणी प्रशासकीय अधिकारी अस्तित्वात नाही अशी गत झाली आहे.
सोलापूर जिल्ह्याचे पालक मंत्री व माण तालुक्याचे आमदार हे सुद्धा आपल्या ताफ्यासह सोलापूर दौऱ्यासाठी याच भयानक रस्त्याने जातात. त्यांना हे दिसते की नाही कोणास ठाऊक?

87
4588 views