logo

*बार्शी : गाडीत गोळी लागून प्लॉटिंग व्यावसायिकाचा मृत्यु – आत्महत्या की खून? तपास सुरू*

बार्शी (५ सप्टेंबर) :
बार्शी तालुक्यातील **सासुरे गावात सोमवारी रात्री एक धक्कादायक घटना** घडली आहे. गोविंद जगन्नाथ बर्गे (वय ३८, मूळ रा. दैठण, ता. गेवराई, जि. बीड) यांचा संशयास्पद मृत्यू झाला असून त्यांचा **गाडीत गोळी लागून मृतदेह आढळून आला**.

घटनास्थळी गाडीतून एक पिस्तूलही जप्त करण्यात आले आहे. सुरुवातीला हा प्रकार आत्महत्या असल्याचे समजले; मात्र घटनास्थळावर मिळालेल्या संशयास्पद बाबींमुळे पोलिसांनी आता या प्रकरणाकडे **खूनाच्या दृष्टीनेही तपास सुरू** केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत गोविंद बर्गे हे प्लॉटिंग व्यवसायात होते. त्यांचा संपर्क पारगाव येथील पूजा गायकवाड यांच्याशी आला आणि त्यातून प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यांनी तिच्यावर मोठ्या प्रमाणात खर्च केला होता. **सोन्याचे दागिने व तब्बल पावणे दोन लाख रुपयांचा मोबाईल दिल्याची माहिती** पुढे आली आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरू होता.

हा वाद मिटवण्यासाठी गोविंद सोमवारी रात्री आपल्या सुरत गाडीतून सासुरे गावातील पूजाच्या घरी आले होते. परंतु मंगळवारी सकाळी गावकऱ्यांना रस्त्यावर गाडी उभी दिसल्याने संशय आला. माहिती मिळताच वैराग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गाडीत गोविंद यांचा मृतदेह व डोक्यात गोळी लागलेली स्थिती दिसून आली.

घटनेचा पंचनामा करण्यात आला असून **बार्शीचे उपविभागीय अधिकारी अशोक सायकर व वैराग पोलीस ठाण्याचे निरीक्षक कुंदन गावडे यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू** आहे. आत्महत्या की खून? याचा उलगडा मात्र अद्याप झालेला नाही.

या घटनेमुळे बार्शी तालुक्यासह परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

0
0 views