logo

ग्लोरीयस फाउंडेशनतर्फे आदर्श शिक्षकांचा सन्मान

दिनांक ५ सप्टेंबर २०२५ रोजी भारत शिक्षक दिनाच्या निमित्ताने शेलारवस्ती,चिखली पुणे येथे ग्लोरिअस ग्लोबल सोशल फाउंडेशन मार्फत संस्थापक डॉ.अनिश विजागत आणि सौ.ज्युलिया विजागत यांच्या अध्यक्षतेखाली "राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा" पार पाडण्यात आला यात ग्लोरीयस ग्लोबल सोशल फाउंडेशन तर्फे शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी १०० आजी-माजी शिक्षकांना व मुख्याध्यापकांना "राष्ट्रीय शिक्षक सर्वोत्कृष्टता पुरस्कार, सर्वोत्कृष्ट शिक्षक उत्कृष्टता पुरस्कार आणि आदर्श शिक्षक पुरस्कार" देऊन त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले.याच अनुषंगाने अनेक विशेष मान्यवर देखील उपस्थित राहिले त्यामध्ये, प्राध्यापक विजय मोहिते (प्राध्यापक आणि प्रदेश संघटक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरद पवार गट),मा.श्री.वाजिद सय्यद (प्रदेशाध्यक्ष महाराष्ट अल्पसंख्याक विभाग),मा.श्री.सचिन बंदी (सरचिटणीस भाजपा युवा मोर्चा पिंपरी चिंचवड,पुणे शहर),ॲड.अँजेलिना पाटील, मा श्री.प्रशांत इलकल सर (प्रसिद्ध उद्योजक, GGSF, सामाजिक कार्यकर्ते), मा. श्री. दिपक (अण्णा) चक्रनारायण (संस्थापक अध्यक्ष ख्रिस्ती नवनिर्माण सेवा व इमॅन्युएल अनाथालय)
या संपूर्ण शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात नियोजक म्हणून ग्लोरिअस कोअर कमिटी व सिनेट बोर्डचे सदस्य बिशप डॉ.प्रदीप वाघमारे (सूत्रसंचालक), बिशप डॉ.अजितकुमार फरांदे, बिशप.सुहासिनी अजितकुमार फरांदे, डॉ.साधना कदम,सौ.प्राजक्ता राठोड,मा.श्री.चार्ल्स सत्राळकर, रेव्ह.शिल्पा यादव हे उपस्थित राहिले आणि सोहळ्याची शोभा वाढविली.

6
737 views