logo

Udgir Crime : एका महिलेस लग्नाचे आमिष दाखवून महीलेवर अत्याचार; आरोपीस दोन दिवसांची पोलीस कोठडी

उदगीर, (जि. लातुर) - एका महिलेस लग्नाचे आमिष दाखवून जबरदस्तीने वारंवार शारीरिक संबंध ठेवले. याप्रकरणी उदगीर शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला असुन पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयापुढे उभे केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.याबाबत पीडित फिर्यादी महिलेने पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी करीम रसुल शेख (रा. माकणी, ता. अहमदपुर) याने पीडित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून ता. १ डिसेंबर २०२४ ते ११ ऑगस्ट २०२५ दरम्यान उदगीर बस स्थानकासमोरील लॉजवर आणि लातूर येथे पीडीतेच्या भाड्याच्या घरी जाऊन जबरदस्तीने वारंवार शारीरिक संबंध केले.
तर फिर्यादी पीडितेने आरोपीस दिलेले पैसे परत मागितले असता आरोपीने शिवीगाळ करून चापटाने, लाथाबुक्क्याने मारहाण केली. तसेच तुला खतम करतो असे म्हणून जिवे मारण्याची धमकी दिली.
याप्रकरणी आरोपी करीम रसुल शेख रा. माकणी (ता. अहमदपूर) विरूद्ध उदगीर शहर पोलिसात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक करून न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तरी यापुढील अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक श्री मोहिते साहेब करीत आहेत.

107
1305 views