logo

वसुंधरारत्न, राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची उपस्थिती

अहमदपुरात भक्ती स्थळावर पाचवा संजीवन समाधी सोहळा उत्साहात साजरा*
राष्ट्रसंताच्या भक्ती स्थळाच्या सर्वांगीण विकासासाठी वचनबद्ध
सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांचे प्रतिपादन. बालाजी पडोळे / शिवाजी श्रीमंगले( विशेष प्रतिनिधी )
अहमदपूर दि.07.09.25 महाराष्ट्र हि संतांची भूमी असून यात राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे कार्य समाजाला प्रेरणादायी आणि ऊर्जादायी असल्याचे सांगून जीवनभर त्याने स्वतःसाठी काही केलं नाही .स्वातंत्र्य लढ्यात आणि समाज परिवर्तनासाठी ते जीवनभर निस्वार्थपणे काम केलं शाल कधी घेतले नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात भक्ती स्थळाच्या सर्वांगीण विकासासाठी वचनबध्द असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांनी केले.
ते दि. सात रोजी भक्ती स्थळ येथे आयोजित पाचव्या संजीवनी समाधी सोहळ्यात बोलत होते.
सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी वीरमठ संस्थांचे मठाधिपदी युवा संत प.पू. राजशेखर गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज हे होते. यावेळी धर्म पीठावर प्रमुख अतिथी म्हणून शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे, प.पू. निळकंठ शिवाचार्य महाराज धारेश्वरकर, प.पू. शंकर लिंग शिवाचार्य महाराज शिरूर अनंतपाळकर, प.पू. शिवलिंग शिवाचार्य महाराज उजनेकर, प.पू.संगनबसवेश्वर शिवाचार्य महाराज निलंगेकर, भक्तिस्थळाचे प्रमुख प.पू.आचार्य गुरुराज स्वामी, भक्ती स्थळ समितीचे अध्यक्ष शि भ प भगवंतराव पाटील चांभरगेकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाचे सचिव शिवानंद हेंगणे, माजी नगरसेवक अभय मिरकले, महेश बँकेचे उपाध्यक्ष निवृत्ती राव कांबळे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष ओमभाऊ पुणे, माजी नगरसेवक चेतन सौंदळे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी बाबासाहेब पाटील पुढे बोलताना म्हणाले की महाराजांनी जीवनभर राष्ट्राला जोडण्याचे काम केले आहे. मी नास्तिक नसून श्रद्धाळू आहे. बालाजी मंदिराप्रमाणे महाराजांच्या मंदिराचे काम झालं पाहिजे. महाराजांच्या नावाप्रमाणे येत्या काळात भक्ती स्थळ आदर्श पाहिजे असे त्यांनी सांगितले.
यावेळी प्रा. मनोहर धोंडे म्हणाले की बहुजन समाजाचे महाराष्ट्रामध्ये दोन धर्म केंद्र आहेत. त्यात बीड जिल्ह्यातील कपिलधार आणि लातूर जिल्ह्यातील अहमदपूर च्या राष्ट्रसंताचे भक्ती स्थळ यांना जपा. भक्ती स्थळावर वर्षातील तीन महत्त्वाचे कार्यक्रम असतात त्यात संजीवनी समाधी, गुरुपौर्णिमा आणि 25 फेब्रुवारीला गुरुमाऊली चा जन्म सोहळा यात सहभागी व्हा.
महाराष्ट्र शासनाने हैदराबाद गॅझेटच्यानुसार मराठा समाजाप्रमाणे लिंगायत समाजालाही ओबीसी मध्ये समावेश करावं अशा स्वरूपाची मागणी शासनाकडे केली.
यावेळी प.पू. निळकंठ शिवाचार्य महाराज धारेश्वर कर, प.पू. शंकरलिंग शिवाचार्य महाराज शिरूर आनंतपाळकर यांचे मनोगत पर भाषणे झाली.
धर्मसभेचा अध्यक्षीय समारोप वीरमठ संस्थांचे मठाधिपदी प.पू. युवा संत राजशेखर गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या आशीर्वाचनाने झाला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक दत्तात्रेय खंकरे यांनी सूत्रसंचालन राम तत्तापुरे आणि आशा रोडगे तत्तापुरे यांनी तर आभार एडवोकेट धन्यकुमार शिवणकर यांनी मांनले.
भक्तांची मांदियाळी संजीवनी समाधी सोहळ्याच्या निमित्ताने वाळकेवाडी, दगडगाव, खेडकर वाडी, मंगनाळी, गंगनबीड, नळेगाव, पांढरवाडी सह 17 गावच्या भाविक भक्तांनी वाजत गाजत दिंड्या शिव नामाचा गजर करत भक्ती स्थळावर आल्या होत्या.
राष्ट्रसंताच्या मूळ समाधीचे दर्शन मार्गाने घेण्यासाठी भक्तांची प्रचंड गर्दी जमलेली होती.
या सोहळ्याला कोषाध्यक्ष सिद्धेश्वर उर्फ मुन्ना पाटील, सदस्य मन्मथ पाटील, सदस्य शिवप्रसाद कोरे, बाबुराव देसाई, शंकराप्पा येरोळे, हावगीप्पा देवणे, निळकंठ बिराजदार, महादेव लामतुरे, सुधाकर मारं मपल्ले, शीलाताई शेटकर, पत्रकार चंद्रकांत हैबतपुरे,मोहन कावडे गुरुजी, उत्तरेश्वर हालकुडे, ऍडव्होकेट गंगाधर कोदळे, सुप्रियाताई घोटे पाटील यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवलिंग पाटील, पद्मिनीताई खराडे, उमा हामणे, संजय उस्तुर्गे, राजकुमार कल्याणे, विनोद हिंगणे, सतीश लोहारे, अनिल कासनाळे यांच्यासह भक्तिस्थाळाच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
संजीवन समाधीचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश सह राज्यातील हजारो भक्तांनी माऊलीच्या समाधीचे दर्शन घेतले. 25 फेब्रुवारीला समाधी मंदिराचे भूमिपूजन 25 फेब्रुवारी 2026 ला राष्ट्रसंतांच्या समाधी मंदिराच्या भूमिपूजन सोहळा महाराष्ट्रातील मान्यवरांच्या हस्ते उपस्थित होणार असल्याचे प्रा मनोहर धोंडे यांनी सांगितले. संजीवन समाधी ही भक्तांची ऊर्जा स्थान त्यामुळे गुरुपौर्णिमा भाद्रपद शुद्ध पौर्णिमा व गुरुवार यांचा जन्मदिनानिमित्त ही मूळ समाधी दर्शनासाठी खुली केली जाते भक्तांना नवीन ऊर्जा मिळते असे युवा संत राज शेखर गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनी सांगितले

137
1112 views