logo

क्युरिओसिटी स्कूल व उज्वल अकॅडमीमध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा...

नांदेड सांगवी येथील क्युरिओसिटी स्कूल व उज्वल अकॅडमीमध्ये शिक्षक दिन साजरा करण्यात आला याप्रसंगी सर्व प्रथम महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी विविध विषय शिकवले त्यामध्ये क्युरिओसिटीचे विद्यार्थी अपूर्वा,स्पर्शिका, दक्ष, काव्या व उज्वल अकॅडमीचे विद्यार्थी दिक्षा , अनुष्का,समिक्षा,स्नेहा, श्रध्दा व प्रतिक्षा अशा बरयाच विद्यार्थ्यांनी खूप उत्तम प्रकारे शिकवले. यानंतर स्वयंशासन दिनानिमित्त एकदिवस कसा वाटला यावर प्रत्येक विद्यार्थ्यांचे मनोगत घेतले गेले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात क्युरिओसिटी स्कूल व उज्वल अकॅडमीचे संचालक प्रा.माधव खिल्लारे म्हणाले की,आज आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करत असताना आज ज्यांचा जन्म दिवस आहे असे व्यक्तिमत्व म्हणजे डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन हे एक सामान्य शिक्षक पदापासून ते राष्ट्रपती पदापर्यंत प्रवास करणारी व्यक्ती म्हणते माझा वाढदिवस हा शिक्षक दिन म्हणून साजरा करा यातून आपल्या जीवनात शिक्षकांचे महत्व काय आहे ते यानिमित्ताने समजते.यावेळी बोलतांना ते म्हणाले कि, शिक्षक दिन म्हणून खरेतर महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या दिवशी साजरा केला पाहिजे कारण खरे शिक्षक ते आहेत हाजारो वर्षे ज्या स्त्री जातीला शिक्षणाचा अधिकार नसून फक्त चूल आणि मुल एवढेच अधिकार होते त्या स्त्रीला या दाम्पत्यानी शिक्षणाचा अधिकार देण्यासाठी काय हालापेष्टा शोषिल्या ते आपण सर्वजण वाचत आहोत असे ते म्हणाले. या कार्यक्रमानिमित्त सौ.आशा खिल्लारे व मुख्याध्यापिका अनुराधा काळे यांनी शिक्षक दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या व सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षकांसाठी पेन व पुष्पगुच्छ देवून आशीर्वाद घेतला या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उज्वल अकॅडमी व क्युरिओसिटीचे शिक्षक जैस्वाल सर, उपरे सर, अंजली मिस, संजना मिस सोनिया मिस, गाढे मिस व चवणे मावशी यांनी परिश्रम घेतले

30
1711 views