logo

धाराशिवः वाशी तालुक्यात भीषण अपघात ; शेतकऱ्याचा मृत्यू

३१ ऑगस्ट रोजी संध्याकाळी पार्डी फाटा येथे शिवाजी सदाशिव गायकवाड (वय ५२) यांचा टेम्पोच्या धडकेत मृत्यू झाला. आरोपी चालक बालाजी अजिनाथ मोरे (रा. मानकेश्वर, भुम) याने निष्काळजीपणे टेम्पो (क्र. MH-42 AR-5154) चालवून गायकवाड यांना ठोकरले, ज्यामुळे ते गंभीर जखमी होऊन मरण पावले. अपघातानंतर चालक वाहनासह पसार झाला. फिर्यादी संजय गायकवाड यांच्या तक्रारीवरून वाशी पोलीस ठाण्यात भा. न्या. सं. कलम 281, 106(1), 184, 134 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

3
784 views