logo

मराठी लाईव्ह न्युजचा सहावा वर्धापन दिन – ‘सत्कार कर्तृत्वाचा’ भव्य सोहळा*

*मराठी लाईव्ह न्युजचा सहावा वर्धापन दिन – ‘सत्कार कर्तृत्वाचा’ भव्य सोहळा*

*पत्रकारितेच्या अविरत प्रवासात मराठी लाईव्ह न्युज या डिजिटल माध्यमाने सहा वर्षांचा यशस्वी टप्पा पार केला आहे. या सहा वर्षांच्या वाटचालीत समाजातील सत्य, प्रेरणा आणि सकारात्मकतेचा दीप पेटवत ठेवणाऱ्या या माध्यमाने यंदा वर्धापन दिन विशेष उपक्रमाने साजरा करण्याचा संकल्प केला आहे.*
*‘सत्कार कर्तृत्वाचा’ या नावाने दिपावलीच्या सुट्टीत रंगणार्‍या या सोहळ्यात समाजाला दिशा देणाऱ्या आणि विविध क्षेत्रात* *उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा* *सन्मान केला जाणार आहे.*
*गेल्या दोन वर्षांत* *वेगवेगळ्या क्षेत्रातील ११ कर्तबगार व्यक्तींना दिग्गज मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले असून, यंदाही तितक्याच थाटामाटात हा मानाचा सन्मान करण्यात येणार आहे.*

*या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे –*

*केवळ सत्कारच नाही तर कर्तृत्ववान व्यक्तींशी प्रेरणादायी संवाद साधला जाणार आहे.*
*त्यांच्या कार्यामागची दृष्टी, संघर्ष आणि समाजाप्रती असलेले योगदान या विषयांवर खास मुलाखतींची मालिका रंगणार आहे.*
*प्रत्येक मान्यवराला सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल व पुस्तक देऊन गौरविले जाणार आहे.*
*आयोजकांच्या म्हणण्यानुसार, “या सर्व मान्यवरांच्या कथा समाजातील इतरांसाठी दीपस्तंभ ठरतील आणि पुढच्या पिढ्यांना कर्तृत्वाची प्रेरणा देतील.”*
*या कार्यक्रमासाठी मान्यवरांशी सप्टेंबर २०२५ या महिन्यात संपर्क साधला जाणार आहे.*
*आपला सहकार्याचा होकार आम्हाला आवश्यक कळवावा.*

*👉 मराठी लाईव्ह न्युजच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त आपली एक फुलस्क्रीन शुभेच्छा जाहिरात देऊन या उपक्रमात सहकार्य करावे, ही नम्र अपेक्षा.*


*--आपला स्नेहाकिंत,*
*मराठी लाईव्ह न्युज नेटवर्क टीम, महाराष्ट्र राज्य*
*📞 9860352960 | 9766939950*

0
0 views