वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा
नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था (नेफडो )च्या साकोली शहर महिला संघटक सौ.तेजस्वीनी तेजराम डोंगरवार मॕडम यांच्या वाढदिवसानिमित्त तलाठी कार्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.साकोली -सेंदूरवाफा नगर परिषदेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या *गणेश विसर्जन कुंड सेंदूरवाफा* येथे विभागीय उपाध्यक्ष यशवंत उपरीकर ,भंडारा जिल्हा महिला अध्यक्षा सौ.प्रिती डोंगरवार ,तालुका महिला सचिव सौ.पुष्पा कापगते ,तालुका महिला उपाध्यक्ष सौ.कुंदा मुंगुलमारे ,नगर परिषद चे कर्मचारी व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.