logo

डॉ. एस.राधाकृष्णन शिक्षण महाविद्यालयात शिक्षक दिन व जयंती साजरी

डॉ. एस. राधाकृष्णन कॉलेज ऑफ एज्युकेशन साकोली येथे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती आणि शिक्षक दिवस कार्यक्रम उत्साहात आयोजित करण्यांत आला.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष विभाग प्रमुख प्रा.अक्षय पुस्तोडे यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या तत्वज्ञानाविषयी सखोल मार्गदर्शन केले. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात शिक्षकांचे महत्वाचे स्थान असून आपण त्याकडे दुर्लक्ष करु शकत नाही. शिक्षक ज्ञानाच्या माध्यमातून व्यक्तीचे जीवन प्रकाशमय बनवतात. यासोबतच संस्कार, नीतीमुल्य, शिकवतात यांच्या माध्यमांतून आदर्श नागरिक घडवण्याचे कार्य शिक्षकांकडून नितांत होत असते. यावेळी त्यांनी असे मत व्यक्त केले की आपल्या महाविद्यालयाचे नाव डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या नावावर असून आपल्या बी. एड महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थी सुद्धा डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याप्रमाणे विद्यार्थी प्रिय शिक्षक बनतील अशी अपेक्षा व्यक्त केली.याप्रसंगी कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुणे प्राचार्य खेमराज राऊत ताराचंदजी निखाडे अ. वि. साकोली यांनी शिक्षक दिनाची सुरुवात कशी झाली याविषयी सखोल असे मार्गदर्शन करून प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात शिक्षकांचे महत्वाचे स्थान व शिक्षक दिन कशा पद्धतीने साजरा करायचा याविषयी मत मांडले. यावेळी कार्यक्रमाला उपस्थित प्रा.चेतन कापगते, प्रा. मृणालिनी बावनकर प्रा.गुलाबराव चौधरी यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले
प्रस्तूत कार्यक्रमाला सूत्रसंचालक म्हणून प्रीती सोनवाणे, तसेच छात्रअध्यापक राम कापगते, थाणेश्वरी बनकर, धनश्री वंजारी, भैरव गोटेफोडे या छात्र अध्यापकांनी मनोगत व्यक्त केले. यासोबतच आदर्श शेंडे यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमाला बी.एड द्वितीय वर्ष सर्व विद्यार्थी आणि प्राध्यापक यांचे सहकार्य लाभले.

28
2720 views