
रायपुरमध्ये ईद ए मिलाद 1500साला उत्साहात साजरी, शहरात भव्य मिरवणूक
रायपुरमध्ये ईद ए मिलाद 1500साला उत्साहात साजरी, शहरात भव्य मिरवणूक
सादिक शाह, प्रतिनिधी, रायपुर.
रायपुर: इस्लाम धर्माचे प्रेषित, मुहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त ईद ए मिलादुन्नबीचा सण शुक्रवारी, दि.5/9/2025रोजी रायपूर शहरात मोठ्या उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या निमित्ताने गावातील मुस्लिम बांधवांनी एक भव्य मिरवणूक काढली, ज्यात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.
या खास दिवसासाठी संपूर्ण शहराला सजवण्यात आले होते. मुस्लिम बहुल भागांमध्ये, घरावर, दुकानांवर आणि रस्त्यांवर आकर्षक विद्युत रोषणाई, पताका आणि हिरव्या रंगाचे झेंडे लावून वातावरण उत्साही करण्यात आले होते.
मिरवणुकीची सुरुवात गावातील जामा मशीद चौकातून झाली. यामध्ये 'नाते पाक' (अल्लाहचे गुणगान) म्हणत लहान मुले आणि मोठे नागरिक हातात ईद मिलादुन्नबीचे झेंडे घेऊन सहभागी झाले होते. ‘इस्लाम धर्माचे प्रेषित’ यांच्या जयघोषांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.
मिरवणुकीनंतर जामा मशिदीजवळ कुरेशी ब्रदर्स यांच्यातर्फे आणि संध्याकाळी झोपडपट्टी भागातील मुस्लिम बांधवांतर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सर्व नागरिकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. शेवटी, जामा मशिदीमध्ये या कार्यक्रमाची सांगता झाली.
हा भव्य सोहळा यशस्वी करण्यासाठी समस्त मुस्लिम समाजाने खूप परिश्रम घेतले. मिरवणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी रायपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार निलेश सोळंके आणि त्यांच्या संपूर्ण टीमने चोख बंदोबस्त ठेवला होता, ज्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही आणि कार्यक्रम शांततेत पार पडला.