logo

Latur Crime: पतीनेच पत्नीचा खुन करुन मृतदेह सुटकेसमध्ये कोंबला; साथीदारांच्या मदतीने उशी दाबून घेतला जीव

उदगीर : वाढवणा पोलिस ठाणे हद्दीतील चाकूर तालुक्यातील शेळगाव फाटा मार्गावरील तिरू नदीवरील पुलाखाली अज्ञात आरोपींने महिलेचा खून करून मृतदेह सुटकेसमध्ये टाकला व पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने नदीत फेकून दिला होता.या गुन्ह्याचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले असून पतीनेच महिलेचा आपल्या साथीदारासह खून केला आहे. या प्रकरणी उत्तर प्रदेशातील मयत महिलेच्या पतीसह पाच जणांना पोलिसांनी अटक केली.
ता.२४ ऑगस्ट रोजी तीरु नदीच्या पुलाखाली सुटकेसमध्ये मृतदेह आढळून आला. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने महिलेची ओळख पटविणे अवघड झाले. त्यावरून पोलिस ठाणे वाढवणा येथे गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळावरून मिळालेली ट्रॉली बॅग, मयताने परिधान केलेली अंतर्वख, जर्किन, डाव्या पायातील काळा दोरा, हातातील पांढऱ्या रंगाची बांगडी, कानातील दागिने व शवविच्छेदन अहवाल यांच्या आधारे तपासाची दिशा निश्चित केली.

या पथकाने तब्बल ३०० मिसिंग मुली व ७० अपहरण प्रकरणांची माहिती तपासली. सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक माहितीचे विश्लेषण, प्रसारमाध्यमे व सोशल मीडियाद्वारे माहिती प्रसिद्ध करणे, मृत महिलेचे एआय स्केच तयार करणे व औद्योगिक भाग, साखर कारखाने, डाळ मिल परिसरात चौकशी केली. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी केलेल्या सूचनेप्रमाणे पथकाकडून उदगीर, अहमदपूर, चाकूर येथील एमआयडीसी तसेच साखर कारखान्यामध्ये, डाळ मिल मध्ये काम करणाऱ्या कामगारांची त्यांच्या कुटुंबीयांची गोपनीय पद्धतीने माहिती मिळविण्यातयेत होती.
दरम्यान एका साखर कारखान्यात मेन्टेनन्सचे काम करणाऱ्या कुटुंबीयांवर त्यांच्या हालचालीवर पथकामार्फत लक्ष ठेवण्यात येत होते. कुटुंबातील एक महिला काही दिवसा अगोदरच अचानक गायब झाल्याची माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने पथक त्या महिलेच्या पतीच्या संशयित हालचालीवर लक्ष ठेवून होते. संशयित पतीने त्याचे बिंग फुटू नये म्हणून तो उदगीर ग्रामीण पोलीस ठाणे येथे आपल्या पत्नीचा फोटो घेऊन पत्नीची मिसींग दाखल करण्यासाठी आला असता पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांनी महिलेच्या फोटोची व नमूद गुन्ह्यातील रेखाचित्राची पडताळणी केली तेव्हा त्यांचा संशय बळावल्याने त्यांनी पोलीस ठाण्याच्या पथकाद्वारे पतीचे सखोल चौकशी केली असता सदरचा गुन्हा त्यांनी केल्याचे निष्पन्न झाले.
उत्तर प्रदेश मधील बडा सिक्किटा, जिल्हा कुशीनगर, उत्तर प्रदेश असे असल्याचे सांगून नमूद गुन्ह्यातील मयत ही त्याची पत्नी असून त्याचे नाव फरीदा खातून (वय-२३) वर्ष असे असल्याचे सांगितले. जिया ऊल हक यास त्याची पत्नी फरीदा हिचे परपुरुषाशी अनैतिक संबंध असल्याचा संशय असल्याने त्यांच्यात नेहमी भांडण होत होते. त्यावरून त्याने पत्नी फरिदाचा खून करण्याचा त्याच्या इतर साथीदारासोबत मिळून कट रचला. १५ ऑगस्ट रोजी दुपारी जिया उल हक याने आपल्या साथीदाराच्या मदतीने फरीदाच्या छातीवर बसून उशी तोंडावर दाबून खून केला आणि फरीदाचा मृतदेह ट्रॉली बॅगेत ठेवून स्थानिक ऑटो भाड्याने घेऊन मृतदेहाची ट्रॉली बॅग नदीत फेकून दिली.
या प्रकरणी आरोपी जीया उल हक (वय-३४), सज्जाद जरूल अन्सारी (वय-१९) वर्ष, अरबाज जमलू अन्सारी (वय-१९), सर्व रा. बडा सिक्किटा, जि. कुशीनगर, उ. प्र., साकीर इब्राहिम अन्सारी वय २४ वर्ष रा. विजयपूर, ता. तमकोइराज, जि. कुशीनगर, उ.प्र., आजम अली सजवाल अली उर्फ गुड्डू (वय-१९) रा. विजयपूर, ता. तमकोइराज, जि. कुशीनगर, उ. प्र.यांना अटक केली असून, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. सर्व आरोपींना गुरुवारी (ता.४) न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
** जन जन की आवाज सोशल मीडिया शिवाजी श्रीमंगले विशेष प्रतिनिधी (MH)

76
3145 views