"पुढच्या वर्षी लवकर या" म्हणत गौरी-गणपती बाप्पांचे भक्तिमय वातावरणात विसर्जन.
प्रतिनिधी. अनिकेत मेस्त्री (कोकण विभाग)
रायगड
अलिबाग तालुक्यात दिनांक २ सप्टेंबर रोजी घरगुती गणपती बाप्पांचे विसर्जन मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडले. "गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या" या जयघोषात बाप्पांना निरोप देण्यात आला.
ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतिषबाजीत आणि नृत्य-मिरवणुकीत गावोगावी विसर्जन सोहळा रंगला. बाप्पाच्या आगमनामुळे गेलेले सात दिवस घराघरांत खेळीमेळीचे आणि आनंदी वातावरण होते.
दररोजच्या भजन-कीर्तन आणि आरत्यांनी परिसर दुमदुमून गेला होता. वर्षभर ओस पडलेली घरेही या काही दिवसांत भाविकांच्या भेटींनी गजबजून गेली होती. बाप्पाच्या निरोपाने वातावरणात हलकी उदासी दाटली असली तरी भाविकांनी पुढच्या वर्षीच्या पुनरागमनाची आतुरतेने वाट पाहण्याचा निर्धार व्यक्त केला.