logo

विरदेल येथे देवकर विद्यालयात शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा


(विरदेल प्रतिनिधी-राकेश बेहेरे पाटील)

विरदेल ता.शिंदखेडा येथील श्रीमंत गो स देवकर विद्यालय येथे ५ सप्टेंबर डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात आला शिक्षक दिनानिमित्त अध्यापनाचे काम इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांनी केले यानंतर विद्यार्थ्यांच्या मनोगताचा कार्यक्रम झाला प्रथम डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर शिक्षकांचे आणि विद्यार्थी शिक्षकांचे गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री जे . एस .पाटील हे होते विद्यार्थी व शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले मनोगतातून डॉ. राधाकृष्णन यांचा जीवन परिचय करून देण्यात आला तसेच विद्यार्थ्यांनी शिक्षक म्हणून शिकवताना आलेल्या अनुभव स्पष्ट केले आणि शिक्षकाचे जीवनातील महत्त्व सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनी केले याप्रसंगी सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते..

32
2712 views