कुणकीच्या मातीतून उमलला यशाचा दिवा : देवयानी नवनाथ तिडके SET परीक्षेत उत्तीर्ण
लातूर
जळकोट तालुक्यातील कुणकी या छोट्याशा गावातून देवयानी नवनाथ तिडके यांनी मोठं यश संपादन करत संपूर्ण तालुक्याचा अभिमान उंचावला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आयोजित सहाय्यक प्राध्यापक पात्रता (SET) परीक्षेत इंग्रजी विषयात त्यांनी यश मिळवले.
कष्टकरी आई-वडीलांच्या आशीर्वादाने व भावाच्या साथीत देवयानी यांनी शिक्षणाचा प्रवास सुरू ठेवला. घरची परिस्थिती साधी असली तरी जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी हा टप्पा गाठला. “आई-वडील व भावाच्या आशीर्वादाशिवाय हे शक्य नव्हतं,” असं ते सांगतात.
गावातील साध्या शेतकरी घरातून आलेली मुलगी आज उच्चशिक्षणाच्या शिडीवर पाऊल ठेवतोय, ही गोष्ट संपूर्ण गावासाठी अभिमानाची आहे. कुणकी गावात आणि तालुक्यात त्यांच्या या यशाबद्दल आनंदाचं वातावरण असून सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत