logo

धुळदेव, माण "डिजेवर बंदी, पण संस्कृतीला नवसंजीवनी – नवतरुण बिरोबा गणेश मंडळाचा पारंपरिक कीर्तन अन् गजीनृत्य उपक्रम.

धुळदेव, माण "डिजेवर बंदी, पण संस्कृतीला नवसंजीवनी – नवतरुण बिरोबा गणेश मंडळाचा गजीनृत्य उपक्रम"

एका बाजूला शासनाने गणेशोत्सवातील डिजेवर बंदी घातली आहे.
तर दुसऱ्या बाजूला धुळदेव येथील नवतरुण बिरोबा गणेश मंडळाने पारंपरिक संस्कृती जपण्यासाठी एक स्तुत्य पाऊल उचलले आहे.

मंडळाच्या वतीने यंदा गणपती उत्सवात नियमित पारंपरिक कार्यक्रमाचे त्यामध्ये कीर्तन, तसेच पारंपरिक खेळ तसेच धनगरी गजीनृत्याचे आयोजन करण्यात आले आहे.
आज गजिनृत्याचे आयोजन करण्यात आले आहे.
आधुनिकतेच्या लाटेत आणि मोठ्या आवाजाच्या डीजेमुळे हरवत चाललेल्या या लोककलेला पुन्हा एकदा समाजासमोर आणून मंडळाने खऱ्या अर्थाने संस्कृतीचा उत्सव साजरा केला आहे.

या उपक्रमामुळे तरुणाईला परंपरेची ओळख होऊन, आपल्या मातीतल्या लोकसंस्कृतीचा वारसा पुढे नेण्यास प्रेरणा मिळणार आहे. 🙏🎶✨

5
1836 views