
पळशी केंद्राची शिक्षण परिषद उत्सहात सपन्न........
मांडवी - आज दिनांक 4 सप्टेंबर 2025 रोजी पळशी केंद्रस्तरीय शिक्षण परिषद सरस माध्य. व उच्च माध्य.विद्यालय मांडवी या ठिकाणी उत्साहात संपन्न झाली. या शिक्षण परिषदेसाठी अध्यक्ष आदरणीय पी.टी.राठोड शिक्षण विस्तार अधिकारी बीट मांडवी, विशेष उपस्थिती आदरणीय श्री नितीन भाऊ राठोड (सचिव इंदिराबाई राठोड ट्रस्ट मांडवी) हे होते. याशिवाय श्री डी डी संदुलवार केंद्रप्रमुख पळशी ,श्री राऊलवार सर मुख्याध्यापक अशोक माध्य. विद्यालय पळशी,श्री इंगळे सर मुख्याध्यापक जि. प. हायस्कूल मांडवी हे होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते प्रतिमांचे पूजन करण्यात आले त्यानंतर मान्यवरांचे पुष्पगुच्छाने स्वागत करण्यात आले.श्री डी.डी संदुलवार यांनी प्रास्ताविक मनोगतात नवीन शैक्षणिक बदल,धोरण,उपक्रम,योग्य दिशेने मार्गक्रमण करण्यासाठी शिक्षण परिषदेची आवश्यकता असल्याचे विशद केले. श्री राउलवार सर, श्री घनश्याम राठोड सर ,श्री वसंत राठोड सर यांनी याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सुलभक श्री वसंत दौडीवार यांनी SHVR संदर्भात पार्श्वभूमी, सहभाग व जबाबदारी याबद्दल मार्गदर्शन केले .श्री मेश्राम सर यांनी SHVR रजिस्ट्रेशन प्रक्रिया कशी करायची याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. श्री पी.टी.राठोड साहेब (शिक्षण विस्तार अधिकारी बीट मांडवी)यांनी अभिलेखे जतन व लेखन याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचलन श्री कुणाल राठोड यांनी तर आभार शाळेचे मुख्याध्यापक श्री रमेश पडगिलवार सर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ श्रीनिवास रेड्डी मु. अ.प्रा. विजय जैस्वाल सर, मधुकर जाधव सर, बजरंग जैस्वाल सर, विजय जाधव सर शैलेश राठोड सर सतीश खडसे, प्रणिता पांडे, सुनीता राठोड, आशा वाघमारे, आर्यन राठोड व दोन्ही माध्यमाचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले सुरुची भोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.