विरदेल गावाचा सुपुत्र श्री.किरण सनेर यांचे SET परीक्षेत यश
(विरदेल प्रतिनिधी-राकेश बेहेरे पाटील)
प्रताप हायस्कूल, अमळनेर जिल्हा जळगाव येथील उपशिक्षक श्री. किरण प्रकाश सनेर यांनी प्राध्यापक पदासाठी आवश्यक असलेली SET (स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट) पात्रता परीक्षा (जून २०२५) यशस्वीरीत्या उत्तीर्ण केली आहे. रसायनशास्त्र विषयात झालेल्या या परीक्षेत त्यांनी ३०० पैकी १४७ गुण मिळवत पात्रता संपादन केली आहे. शैक्षणिक क्षेत्रात पुढे उच्च शिक्षण घेणे तसेच संशोधन कार्य करण्याचा त्यांचा दृढ मानस आहे. सनेर सरांच्या या यशाबद्दल शैक्षणिक, सामाजिक व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले असून भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.