logo

म्हसवड तालुका माण येथे आज पैगंबर जयंती निमित्त मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन.

म्हसवड तालुका माण येथे आज पैगंबर जयंती निमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन.
सविस्तर
सार्वजनिक गणेश विसर्जन शनिवारी असल्याने विसर्जन मिरवणूक आज पासून सुरू होणार आहेत.
त्यामुळे आज शुक्रवारी असलेली पैगंबर जयंती साध्या पद्धतीने साजरी करत मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्याचा निर्णय म्हसवड शहर परिसरातील मुस्लिम समाज बांधवांनी घेतला आहे.
त्यासोबतच गणेश विसर्जन मिरवणुका आणि वाहतुकीचा पोलिस प्रशासनावर येणारा ताण लक्षात घेता पोलिसांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत मुस्लिम बांधवांनी पैगंबर जयंती निमित्त काढली जाणारी फेरी जुलूस रद्द करण्याचा निर्णय यानिमित्ताने घेतला. तसे निवेदन पोलिस प्रशासनास देण्यात आले आहे. म्हसवड शहरातील भगवान गल्ली येथे आरोग्य शिबिराचे आयोजन केले असून शिबिराचे उद्घाटन माण तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ लक्ष्मण कोडलकर यांच्या हस्ते केले जाणार आहे. शिबिरास म्हसवड प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी वैद्यकीय अधिकारी त्यासह डॉ प्रमोद गावडे, डॉ बाबासाहेब दोलताडे, डॉ निखिलेश शेटे, डॉ सौरभ दोशी हे उपस्थित राहून सेवा देणार आहेत.

0
0 views