**धाराशिवः भाविकांचा भीषण अपघात – दोघांचा जागीच मृत्यू, तिघे गंभीर जखमी**
धाराशिव, ५ सप्टेंबर :तुळजाभवानी देवीचे दर्शन घेऊन कर्नाटकातील आळंद येथे परतणाऱ्या भाविकांच्या कारला नळदुर्ग-जळकोट मार्गावर भीषण अपघात झाला. ही घटना ४ सप्टेंबर रोजी सकाळी घडली.या अपघातात **प्रीतम सुशीलकुमार पांचाळ (३२)** आणि **रेवणसिद्ध राजशेखर निकुडूगी (३०)** या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर **मल्लू रामचंद्र कल्ला (२७), गिरजाप्पा जगन्नाथ शरणम्मा (४०)** आणि आणखी एक भाविक गंभीर जखमी झाले आहेत.महामार्ग पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने नळदुर्ग येथील रुग्णालयात हलविण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांकडून अपघाताची नोंद घेण्यात आली आहे.