
अलंगुण येथे मोफत आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी शिबीर संपन्न.
अलंगुण l कृष्णा पवार:- दि.४ ऑगस्ट २०२५ रोजी ग्रामपंचायत अलंगुण येथे मोफत आरोग्य तपासणी नेत्र तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले. ग्रामीण रुग्णालय सुरगाणा चे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली व आरोग्य केंद्र पळसनच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. लोहाट यांच्या सहकार्याने हा उपक्रम पार पडला.
या शिबिरात अलंगुण व परिसरातील नाईकपाडा, बोरपाडा, मोकपाडा येथील मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला.
त्यांमध्ये सर्वसाधारण आरोग्य तपासणी,
Intensified IEC Campaign अंतर्गत एचआयव्ही व क्षयरोगाबाबत जनजागृती,
मोफत नेत्र तपासणी व मोफत नेत्र शस्त्रक्रियेसंदर्भातील उपलब्ध उपचार सुविधांची माहिती देण्यात आली.
या उपकेंद्र अलंगुण येथील CHO डॉ. पार्वती साबळे, नेत्र चिकित्सक अक्षय सोनवणे, प्रयोगशाळा वैज्ञानिक राकेश महाले, समुपदेशक राजेश मिश्रा, अलंगुण येथील आशासेविका हौसा गावित सरला पवार व हौसा जाधव, महालॅब तज्ञ, रोहित गावित, गणराजे मित्र मंडळाचे सदस्य,संदीप गावित, भूषण गावित,हिरामण पवार,योगेश पवार , कैलास पवार,अजय जाधव राजेंद्र पवार संजय चौधरी तसेच ग्रामपंचायत अलंगुणचे सर्व अधिकारी-कर्मचारीआणि ग्रामस्त उपस्थित होते .