
नूतन ज्ञान मंदिरात विद्यालयात शिवणकाम वर्गाचे भव्य उद्घाटन
नूतन ज्ञान मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अडावद ता. चोपडा जि. जळगाव व समता फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने आज दिनांक 04 सप्टेंबर 2025 वार गुरुवार रोजी नूतन ज्ञान मंदिर विद्यालयात शिवणकाम वर्गाचे भव्य उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेच्या सचिव आदरणीय सौ. सुषमाताई केदारजी थेपडे यांनी स्वीकारले होते. त्यांच्या समवेत व्यासपीठावर सौ सुलभाताई प्रसादजी काबरा, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री आर जे पवार सर, उप मुख्याध्यापक श्री एस के भंगाळे सर ,पर्यवेक्षक श्री के आर कणखरे सर व प्रमुख पाहुणे म्हणून चोपडा पंचायत समितीचे माजी सभापती श्री. डी. पी. साळुंखे सर तसेच समता फाउंडेशनचे समन्वयक मा. श्री विजय तायडे साहेब , उज्वला पाटील, तडवी मॅडम, पूजा मॅडम तसेच गावातील व परिसरातील पालक बंधू भगिनी उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सरस्वती मातेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री के आर कणखरे सर यांनी केले. त्यात त्यांनी विद्यार्थ्यांनी शालेय अभ्यासक्रमा सोबतच व्यावसायिक शिक्षणाचे कौशल्य आत्मसात केले पाहिजे असे सांगितले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा शाळेच्या वतीने शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यानंतर शिवणकाम वर्गाचे उद्घाटन संस्थेच्या सचिव आदरणीय सौ सुषमाताई केदारजी थेपडे यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे श्री. डी. पी. साळुंखे यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना ग्रामीण भागातील महिलांनी हातकलेच्या माध्यमातून कशी प्रगती साधली, याची उदाहरणे देत कौशल्य शिक्षण ही काळाची गरज असून अशा उपक्रमांमुळे समाजात परिवर्तन घडून येते असे सांगितले .समता फाउंडेशनचे समन्वयक मा श्री विजय तायडे साहेब यांनीही संस्थेच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली .विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री आर जे पवार सर यांनी देखील मनोगत व्यक्त करून विद्यार्थिनींना या वर्गात प्रामाणिकपणे प्रशिक्षण घेऊन स्वावलंबनाचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहन केले . कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ. सुषमाताई केदारजी थेपडे यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थिनींना स्वावलंबनाचे महत्त्व पटवून सांगितले. त्यांनी शिवणकाम ही केवळ कला नव्हे तर उपजीविकेचे साधन आहे यातून महिलांना आत्मनिर्भर होण्यासाठी मोठा हातभार लागेल, असे प्रतिपादन केले.
विद्यार्थिनींना या शिवणकाम वर्गामुळे केवळ हातकलेचे कौशल्य विकसित होणार नसून आत्मविश्वास व उद्योगशीलता यांची जोपासना होणार आहे, असा विश्वास सर्व मान्यवरांनी व्यक्त केला.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा श्री एम एम पाटील सर यांनी केले केले. सदर कार्यक्रमाचे छायाचित्रण व फोटो संकलन विद्यालयाचे शिक्षक श्री एस आर महाजन सर व श्री एस डी खोडपे सर यांनी केले व कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समस्त शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी यांचे अनमोल सहकार्य लाभले.