logo

आज सात महिने झाले अजून भूमिहीन शेतमजूर झोपडपट्टी धारकांना न्याय भेटला नाही जेवळी ता लोहारा जिल्हा धाराशिव येथील भ्रस्ट ग्रामपंचायत कार्यकारणी लोक याच्या कडून फक्त या सर्व लोकांना झोपडपट्टी येथील जागेवर अतिक्रमण करून मलाई खाययचे आहे

माननीय मुख्यमंत्री अँड न्याय व्यवस्थापक ,
उपमुख्यमंत्री,भूकंप पुनर्वशन मंत्री ,ग्राम विकास मंत्री,महसूल मंत्री साहेब
मंत्रालय कक्ष मुंबई
विषय :- पुनर्वशन गावातील कुटुंब याचे वारस याना जुनी संपादन झालेले झोपडपट्टी ही जागा त्या वारस कुटुंबाचा विचार करून त्यांना तिथे घरकुल बांधून देण्याबाबत
महोदय
मी महादेव बाबू शिंदे रा जेवळी ता लोहारा जिल्हा धाराशिव येथे मागील 40 ते 45 वरश्यापासून राहत असून माझ्या आई ला आणि इतर 132 भूमिहीन शेतमुजुर झोपडपट्टी सण 1983 साली दोन शेतकरी याची 1,62 आर इतकी जमीन गट क्रमांक 970 पैकी जुना फेरफार 914 प्रमाणे जुना सर्वे न 429/1,429/2 पैकी नवीन फेरफार न 3064 या नुसार भुमोहिन शेतमजूर झोपडपट्टी धारकासाठी 81+81=1,62 आर इतकी जागा श्री बंडू गणपती बिराजदार आणि गुंडू गणपती बिराजदार याची रीतसर त्याचा मोबदला देऊन सण 1983 साली भू संपादन करून त्या 132 भूमिहीन शेतमजूर झोपडपट्टी धारक याना घरकुल या संदर्भात बांधून सॅन 1986 साली त्या 132 भूमिहीन शेतमजूर झोपडपट्टी धारकांना स्वाधीन करण्यात आली होती आणि आहे परुंतु 1993 साली अभ्याड प्रमाणे या जेवळी ता लोहारा जिल्हा धाराशिव येथे भूकंप झाला त्या वेळी एक सर्वे नुसार त्या म्हणजे संपूर्ण जेवळी ता लोहारा जिल्हा धाराशिव येथील आणि आजूबाजूचे 52 गावचे एक येजेंशी मार्फत सर्वे करून रेशन कार्ड द्व्यारे आणि शेती प्रमाणे आणि शेती अवजारे प्रमाणे तीन गटात पुनर्वशन केले गेले आणि त्या लाभार्थी याना त्याच्या शेती आणि अवजारे या नुसार नवीन घरे बांधून दिले गेले आणि या भूमिहीन शेतमजूर धारकांना प्रति कुटुंब प्रमाणे दोन रूम चे म्हणजे 250 sq या प्रमाणे घरे बांधून देण्यात अली होती आणि आहे परुंतु त्या 132 भूमिहीन शेतमजूर झोपडपट्टी धारकाचे कुटुंब मोठे झाले आहे आणि हे 132 भूमिहीन शेतमजूर झोपडपट्टी धारक शासन दरबारी आणि सरकार यांनी मागे घरकुल साठी सेल्फ सर्वे करण्यासाठी महाराष्ट्रातील जनतेला सांगण्यात आले होते त्या प्रमाणे येथी सर्व 132 भूमिहीन शेतमजूर झोपडपट्टी धारक यांनी तश्याप्रमाणे सेल्फ सर्वे केले आहे ते अंतिम टप्प्यात आहे तरी वरील गोरगरिबांच्या सरकार याना मी महादेव बाबू शिंदे जेवळी ता लोहारा जिल्हा धाराशिव या 132 भूमिहीन शेतमजूर झोपडपट्टी धारक याच्या वतीने मी आपणास विनंती करीत आहे
सोबत गट क्रं 970 चा सातबारा जोडत आहे
आपला कळवा
महादेव बाबू शिंदे
माहिती स्तव
1) जिल्हा अधिकारी धाराशिव
2) उपजिल्हा अधिकारी sdo उमरगा
3) ग्रामपंचायत विभाग धाराशिव
4) मुख्य कार्यकारी अधिकारी छत्रपती संभाजी नगर
5) तहसीलदार कार्यालय लोहारा
6) गटविकास अधिकारी (पंचायत समिती) लोहारा
7) भूमिअभिलेख अभियंता लोहारा
8 ग्रामपंचायत कार्यालय जेवळी

36
994 views