logo

साकेगावात अवैध दारूबंदीसाठी महिलांचे उपोषण; प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे*

*साकेगावात अवैध दारूबंदीसाठी महिलांचे उपोषण; प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे*
रायपूर, (प्रतिनिधी): ग्राम साकेगाव येथे अवैध दारूविक्रीविरोधात तीन महिलांनी सुरू केलेले उपोषण आज, 04/09/2025 रोजी प्रशासनाने दिलेल्या लेखी आश्वासनानंतर स्थगित करण्यात आले. गावातील दारूबंदीची मागणी करत कांताबाई सीताराम धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण सुरू होते.
या उपोषणाची दखल घेत, मा. तहसीलदार काकडे साहेब (चिखली), विद्यमान आमदार श्वेताताई महाले पाटील, रायपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार, सहायक पोलीस निरीक्षक निलेश सोळंके, राज्य उत्पादन शुल्क अधिकारी वाघ साहेब, सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक उपोषणस्थळी उपस्थित होते.
यावेळी, उपोषणकर्त्या महिलांनी गावातील अवैध दारूविक्रीमुळे होणाऱ्या सामाजिक दुष्परिणामांवर प्रकाश टाकला. प्रशासनाने या गंभीर समस्येची नोंद घेऊन तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस विभागाने गावातील अवैध दारू पूर्णपणे बंद करण्यासाठी लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. या निर्णयामुळे गावातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, प्रशासनाच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

65
1997 views