logo

रायपूर येथे ' एकता ग्रुप 'तर्फे ईद मिलादूननबी (स. अ.) दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न.

रायपूर येथे ' एकता ग्रुप 'तर्फे ईद मिलादूननबी (स. अ.) दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न.
सादिक शाह रायपूर aima Media news network
रायपूर 03 सप्टेंबर 2025 रोजी : रायपूर गावातील विविध ठिकाणी एकता ग्रुपच्या वतीने ईद मिलादूननबी (स. अ.) दिनानिमित्त एक यशस्वी वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात जि.प.उर्दू हायस्कूल , जि.प प्राथमिक उर्दू व मराठी शाळा,डॉ.जकिर हुसैन कनिष्ठ महाविद्यालय, लाला बाबा दर्गा ईद गाह परिसर,पोलीस स्टेशन व प्राथमिक आरोग्य केंद्र परिसर,मुस्लिम कब्रातान, तसेच सर्व शाळेच्या प्रांगणात विविध प्रकारच्या झाडांची लागवड करण्यात आली, ज्यात सर्व शाळांचे विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.
कार्यक्रमाची सुरुवात उर्दू हायस्कूलचे प्रांगणात रायपूर पोलीस स्टेशनचे नवनियुक्त ठाणेदार श्री. निलेश सोळंकी साहेब यांचे अध्यक्षतेखाली साहेबांचे हस्ते वृक्षारोपण करून झाली. त्यानंतर,गावातली प्रमुख मंडळी, सरपंच पती सुनील बबनराव देशमाने, बालाप्रसाद जैस्वाल, डॉ.बाहेती, फारुक सेठ सौदागर,मो.एजाज मो.मंजुर, डॉ.प्रकाश खंडागळे, दत्तू सिरसाट, राजू नेता,भिकन भाई,सलीम खान,शे.वसीम भाई,शे. अफसर भाई,शे.सलीम भाई, वसीम शाह, शे. कलीम शे.बनू,सय्यद जीलानी भाई,प्रेमानंद सरकटे तसेच अन्य मान्यवर व शाळेचे मुखयाध्यापक शे.जुबेर सर,सय्यद तन्वीर सर, शफीक सर,तसेच सर्व शिक्षकांनी आणि इतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांनी मिळून शाळेच्या आवारात झाडे लावली. वृक्षारोपण हे केवळ एक कार्यक्रम नसून, आपल्या भावी पिढ्यांसाठी केलेली एक महत्त्वाची गुंतवणूक आहे. झाडे आपल्याला ऑक्सिजन देतात, पर्यावरणाचा समतोल राखतात आणि निसर्गाची सुंदरता वाढवतात, हे कार्यक्रमाचे उद्देश होते.
या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाबद्दल प्रेम आणि पर्यावरणा विषयीची जबाबदारीची भावना जागृत झाली. या उपक्रमामुळे शाळेचा परिसर अधिक हिरवागार होण्यास मदत झाली आणि पर्यावरणाच्या संवर्धनासाठी एक सकारात्मक संदेश सर्वत्र पोहोचला.
वरील प्रमाणे कार्यक्रमाचे आयोजन एकता ग्रुप रायपूर तर्फे करण्यात आले होते. एकता ग्रुप चे अध्यक्ष मो.फयाज मो.एजाज, उपाध्यक्ष मुकीम शाह कलीम शाह,सचिव शे. अजहर शे. अफसर, रेहान खान, इमरान खान,(अली भाई), शे.मजहर शे. साहिल,सय्यद अनीस, शाहेजाद खान, शे. अयान,असिफ खान, नसीम शाह,फारुख खान, ह्या सर्वांची हजेरीत कार्यक्रम उत्साहात साजरा झाला.

81
3125 views