logo

अर्धापूरचा अमोल सरोदे अर्थशास्त्र विषयात ‘सेट’ परिक्षेत यशस्वी


सातारा (म्हसवड ता. माण)
अर्धापूर (जि. नांदेड) – नुकत्याच जाहीर झालेल्या महाराष्ट्र व गोवा राज्यस्तरीय पात्रता म्हणजेच ‘सेट’ (SET) परिक्षेत अर्धापूरचा (नांदेड) अमोल उद्धवराव सरोदे याने अर्थशास्त्र विषयात घवघवीत यश मिळवले.

दि. १५ जून रोजी पार पडलेल्या या परीक्षेचा निकाल ३० ऑगस्ट रोजी जाहीर झाला. या परीक्षेला एकूण ९०,३६६ उमेदवार बसले होते, त्यापैकी ६,०५० जण उत्तीर्ण झाले. त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, अर्धापूरचे अमोल सरोदे यांनी कुठल्याही खाजगी क्लासशिवाय स्वतःच्या मेहनतीने, जिद्दीने हे यश संपादन केले.

अमोल सरोदे यांनी प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद कन्या शाळा अर्धापूर, माध्यमिक शिक्षण जिल्हा परिषद हायस्कूल अर्धापूर येथे पूर्ण केले. बारावीचे शिक्षण यशवंत महाविद्यालय, नांदेड तर बी.ए. शंकरराव चव्हाण महाविद्यालय, अर्धापूर येथून केले. पुढे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथून अर्थशास्त्र विषयात एम.ए. पदवी त्यांनी प्राप्त केली.

अमोल हे भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा संघटक व पत्रकार उध्दव सरोदे यांचे धाकटे सुपुत्र आहेत. त्यांच्या कुटुंबातील मोठा मुलगा ॲड. गौरव सरोदे न्यायालयीन वकिली व्यवसायात कार्यरत आहे, दुसरा मुलगा वैभव सरोदे सीआयएसएफमध्ये जमादार आहे, तर मुलगी सौ. रमा प्रविण जाधव पोलीस विभागात कार्यरत आहे. अशा या संघर्षमय पार्श्वभूमीवर अमोल यशस्वी झाले आहेत.

अमोल सरोदे यांच्या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुकाची लाट उसळली आहे. विविध मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

5
91 views