logo

*पाटणसावंगी जवळ सायंकाळी भीषण अपघात – हितज्योती आधार फाउंडेशनची टीम मदतीसाठी धावली*

प्रतिनिधी:सूर्यकांत तळखंडे

सावनेर, दि. ३ सप्टेंबर – सावनेर पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या नागपूर रोडवरील पाटणसावंगी परिसरात आज सायंकाळी भीषण अपघात घडला. या अपघातात सहभागी वाहनाचा क्रमांक MH 40 R 5182 असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अपघातामुळे घटनास्थळी काही काळ वाहतूक कोंडी झाली. स्थानिक नागरिकांच्या मते अपघात इतका जोरात झाला की, आजूबाजूला असलेल्या लोकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण पसरले.

अपघातानंतर तात्काळ मदतकार्य सुरू करण्यात आले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले असून, त्यांची प्रकृतीबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही. यावेळी हितज्योती आधार फाउंडेशनची टीम धावून आली आणि अपघातग्रस्तांना तातडीची मदत केली.

फाउंडेशनच्या सदस्यांनी त्वरित मदतकार्य हाती घेतले. घटनास्थळी जखमींना प्राथमिक उपचार देणे, रुग्णवाहिका व्यवस्था करणे, तसेच पोलिसांना सहकार्य करणे अशी महत्त्वाची जबाबदारी त्यांनी पार पाडली. अपघाताच्या काळोखात हितज्योती फाउंडेशनने आशेचा किरण बनून जखमींना दिलासा दिला.

घटनेची माहिती मिळताच सावनेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघाताचे कारण समजून घेण्यासाठी पंचनामा सुरू असून, वाहनाचा वेग, रस्त्याची परिस्थिती व इतर घटकांचा तपास केला जात आहे. या अपघातामुळे काही काळ नागपूर रोडवरील वाहतूक विस्कळीत झाली होती, मात्र पोलिसांच्या तत्परतेमुळे वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आले

31
4638 views