logo

तालुका स्तरीय विज्ञान नाट्योत्सवात थेपडे विद्यालयाला मिळाला तृतीय क्रमांक

दि. 2/9/2025 रोजी जळगाव येथे पंचायत समिती व म.न.पा. शिक्षण विभाग जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने तालुका स्तरीय विज्ञान नाट्योत्सव उत्साहात संपन्न झाला. नाटीकेचा विषय मानव कल्याणासाठी विज्ञान व तंत्रज्ञान हा होता, त्यात जळगाव तालुक्यातील व शहरातील अनेक शाळांनी सहभाग नोंदविला. जळगांव तालुक्यातील म्हसावद या गावातील स्वातंत्र्य सैनिक पं. ध. थेपडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी *सर्वांसाठी स्वच्छता* या विषयाअंतर्गत *स्वच्छ गाव सुंदर गाव* या नाटिकेचे सादरीकरण केले होते. त्यांच्या या नाटिकेला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले. संस्थेचे चेअरमन आदरणीय डॉ.के.पी.थेपडे सर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले विद्यालयातील मुख्याध्यापक आदरणीय श्री पी.डी. चौधरी सर, उपमुख्याध्यापक आदरणीय श्री जी डी बच्छाव सर व पर्यवेक्षक आदरणीय श्री के.पी. पाटील सर यांच्या मार्गदर्शनाने या नाटिकेचे दिग्दर्शन विद्यालयातील कलाशिक्षक श्री. वाय. एन. शिंदे सर व सहाय्यक दिग्दर्शन श्री. डी. एम. सोनवणे यांनी केले. या नाटिकेसाठी श्रीमती वाय. आर. पाटील मॅडम व श्रीमती वैशाली सूर्यवंशी मॅडम व विज्ञान मंडळातील सर्व शिक्षकांनी सहकार्य केले.

15
803 views