logo

इंदिरा गांधी मध्ये हमारा विद्यालय हमारा स्वाभिमान चा संकल्प

इंदिरा गांधी हायस्कूल व इंदिरा गांधी प्राथमिक शाळेच्या वतीने
हमारा विद्यालय हमारा स्वाभिमान हा प्रेरणादाई व संस्कारक्षम उपक्रम घेण्यात आला.
या निमित्ताने मुख्याध्यापक, उप मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी शाळा परिसर स्वच्छ ठेवणे, सामाजिक मूल्यांची जपवणूक करणे, अनुशासन रुजवणे, पर्यावरणाची काळजी घेणे, सामाजिक समरसता व नागरिक कर्तव्याचे पालन करणे, शाळा ही फक्त ज्ञानार्जनाचे केंद्र म्हणून न पाहता ते राष्ट्रीय चारित्र्य निर्माण करण्याचे केंद्र म्हणून पाहणे आवश्यक आहे अशा प्रकारचा संकल्प शिक्षक व विद्यार्थ्यांनी प्रार्थनेच्या वेळी घेतला.
याप्रसंगी प्राथमिकच्या मुख्याध्यापिका शिंदे मॅडम , शाळेचे पर्यवेक्षक रमेशजी सज्जन, प्राथमिकचे जेष्ठ शिक्षक कल्याणकर सर, माध्यमिकचे एम. टी. कदम यांनी विद्यार्थ्यांना या संदर्भात मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

7
309 views