logo

निलंगा तालुक्यातील श्रीपाद एकीले राज्यशास्त्र SET परीक्षा उत्तीर्ण, कुटुंबासोबत वाटले यशाचे क्षण**

निलंगा तालुक्यातील श्रीपाद एकीले राज्यशास्त्र SET परीक्षा उत्तीर्ण, कुटुंबासोबत वाटले यशाचे क्षण**



निलंगा तालुका | निलंगा तालुक्यातील चिंचोली भं येथील श्रीपाद भिवाजी एकीले यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे 15 जून 2025 रोजी घेण्यात आलेल्या सहाय्यक प्राध्यापक पात्रता (SET) परीक्षेत राज्यशास्त्र विषयात यश संपादन केले आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात त्यांनी उत्तीर्ण होऊन निलंगा तालुक्याचे नाव अभिमानाने उंचावले आहे.

कठीण परिस्थितीतून जिद्द, चिकाटी आणि कष्ट यांच्या जोरावर हे यश मिळवणाऱ्या श्रीपाद एकीले यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. आपल्या यशाचे संपूर्ण श्रेय ते आई-वडील आणि भावाला देतात. *"माझ्या आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर आई-वडील व भावाने दिलेल्या आशीर्वाद आणि पाठबळामुळेच हे यश शक्य झाले,"* असे त्यांनी सांगितले.

निलंगा तालुक्यातून या यशस्वी कामगिरीबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

26
725 views