logo

भजनी मंडळांसाठी शासनाचा अनुदान निर्णय स्वागतार्ह, पण अटींनी घातली अडचण

भजनी मंडळांसाठी शासनाचा अनुदान निर्णय स्वागतार्ह, पण अटींनी घातली अडचण


शिंदखेडा प्रतिनिधी :
महाराष्ट्र शासनाने राज्यातील भजनी मंडळांना साहित्य खरेदीसाठी २५ हजार रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला असून ही योजना कौतुकास्पद आहे. मात्र, या अनुदानासाठी शासनाने लावलेल्या कठोर अटी व नियमांमुळे ग्रामीण भागातील अनेक भजनी मंडळांची दमछाक होत आहे.

भजनी मंडळ नोंदणी नसणे, मंडळाध्यक्षांचे आधार व पॅनकार्ड, ई-मेल आयडी, ग्रामपंचायतीचा दाखला, बँक खाते, आयएफसी कोड अशा कागदपत्रांची पूर्तता करणे ग्रामीण मंडळांसाठी अवघड ठरत आहे. त्यामुळे शासनाने या अटी शिथिल करून खरी मंडळे व भजन परंपरेला मदत करावी, अशी मागणी शिंदखेडा तालुका वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष ह.भ.प. पांडुरंग पुना माळी यांनी केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भजन व संस्कृतीला नवसंजीवनी देण्यासाठी हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला असला, तरी मंडळांना प्रत्यक्ष लाभ मिळण्यासाठी नियम सोपे करणे अत्यावश्यक असल्याचे मत परिषद पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.


---

चौकट

“महाराष्ट्र शासनाने घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. मात्र नियम व अटी शिथिल करून खरी भजनी मंडळे या योजनेचा लाभ घेऊ शकतील, यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा.”
– पांडुरंग माळी, अध्यक्ष शिंदखेडा तालुका वारकरी साहित्य परिषद


3
45 views