logo

म्हसवड येथे लक्ष्मी गणेश मंडळ भगवान गल्ली तर्फे वृक्षारोपण कार्यक्रम



सातारा : (म्हसवड ता. माण )
पर्यावरण संरक्षण व हरित महाराष्ट्र या संकल्पनेला हातभार लावण्यासाठी सोमवार दि. १ रोजी लक्ष्मी गणेश मंडळ भगवान गल्ली यांच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा उपक्रम म्हसवड पोलीस स्टेशन व प्राथमिक आरोग्य केंद्र म्हसवड येथे पार पडला.

सर्वप्रथम म्हसवड पोलीस स्टेशन परिसरात एपीआय अक्षय सोनवणे साहेब यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र म्हसवड येथे डॉक्टर कोडलकर यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी लक्ष्मी गणेश मंडळ भगवान गल्लीचे सर्व पदाधिकारी व सभासद उत्स्फूर्तपणे उपस्थित होते. सामाजिक बांधिलकी जपत मंडळाने केलेल्या या उपक्रमाचे स्थानिक नागरिकांनी स्वागत केले.

कार्यक्रमाचे आयोजन करताना मंडळाने "एक झाड लावा – पर्यावरण वाचवा" हा संदेश दिला. तसेच लावलेल्या रोपांची निगा राखण्याचा संकल्प सर्वांनी केला.

अशा उपक्रमांमुळे समाजात पर्यावरणपूरक जाणीवा वाढीस लागतील, तसेच मंडळाच्या सामाजिक कार्याची नवी दिशा दिसून आली

49
1957 views