
विरदेल येथे देवकर विद्यालयाच्या वतीने‘भटके विमुक्त दिवस’ उत्साहात साजरा....
(विरदेल प्रतिनिधी-राकेश बेहेरे पाटील)
देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात भटक्या विमुक्त समाजाचे स्वातंत्र्याच्या चळवळीतील व राष्ट्रउभारणातील योगदान लक्षात घेऊन त्यांच्या सन्मानार्थ ३१ ऑगस्ट हा दिवस “भटके विमुक्त दिवस” म्हणून राज्यात सर्वत्र साजरा करणेबाबत महाराष्ट्र शासनाने नुकतेच परिपत्रक निर्गमित केलेले होते. त्या नुसार श्रीमंत गो सं देवकर विद्यालय विरदेल ता शिंदखेडा जि धुळे येथे रविवारी 'भटके विमुक्त दिवस' साजरा करण्यात आला
याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री जे एस पाटील हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते तसेच कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यालयाचे पर्यवेक्षक व नाशिक विभागीय अध्यक्ष शिक्षक आघाडी,भटके विमुक्त हक्क परिषद महाराष्ट्र राज्य,श्री एस एस गोसावी यांनी भूषविले कार्यक्रमाच्या सरुवातीला विद्यार्थ्यानी विविध सांस्कृतीक व शैक्षणिक कार्यक्रम सादर केले आपल्या मनोगतातून विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री जे एस पाटील यांनी भटके विमुक्त जाती व त्यांना मिळणाऱ्या विविध शासनाच्या शिष्यवृत्ती योजना विषयी महिती दिली आपल्या अध्यक्षीय भाषणातून विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री एस एस गोसावी यांनी शासनाचे विशेष आभार मानले सदर कार्यक्रमासाठी विरदेल केंद्राचे केंद्रप्रमुख आबासाहेब श्री गुलाब सोनवणे यांची विशेष उपस्थिती लाभली सदर भटके विमुक्त दिवसासाठी विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री सुनिल चौधरी यांनी केले