logo

आलापल्लीत आयटीआय बेरोजगारांचा रोजगार मेळावा 100 विद्यार्थ्यांची लाईड मेटल मध्ये नियुक्ती

आलापल्लीत आयटीआय बेरोजगारांचा रोजगार मेळावा
100 विद्यार्थ्यांची लाईड मेटल मध्ये नियुक्ती
नागेपल्ली::::
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आलापल्ली स्थित नागेपल्ली येथे आज रोजगार मेळावा व नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत कार्यक्रम आयोजित केला होता. या रोजगार मेळाव्यात लायड मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड या नामांकित उद्योग समूहात आयटीआय आलापल्ली तसेच लगतच्या इतर आयटीआय मधील तब्बल 100 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.
या निवडीमुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष औद्योगिक क्षेत्रात काम करण्याची संधी उपलब्ध झाल्याची माहिती आयटीआय विद्यार्थ्यांनी दिली.
आयटीआयच्या मध्ये प्रवेशित नवीन विद्यार्थ्यांचे पहिल्याच दिवशी प्रवेश दिन उत्साहात साजरा करण्यात आला. नव्या विद्यार्थ्यांचे स्वागत करताना संस्थेच्या प्राचार्य व अध्यापकांनी आयटीआय मधील प्रशिक्षण, शिस्त आणि भविष्यातील संधी याबाबत मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक तसेच विविध मान्यवरांनी उपस्थिती लाभली.
नवीन शैक्षणिक क्षेत्राचा शुभारंभ करताना विद्यार्थ्यांना कौशल्याधारित शिक्षणाचे महत्त्व आणिऔद्योगिक क्षेत्रातील रोजगार संधी बाबत मार्गदर्शन यावेळी करण्यात आले. संस्थेचे प्राचार्य व सर्व अध्यापकांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे व नवागत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना उज्वल भविष्याच्या शुभेच्छा दिल्या.

10
3870 views