logo

"भोकरदनमध्ये पहिल्यांदाच यशस्वी कृत्रिम सांधा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया – ग्रामीण आरोग्यसेवेत नवा अध्याय"

डॉ. कार्तिक रासने यांच्या सारख्या समर्पित डॉक्टरांच्या कामामुळे भोकरदनसारख्या ग्रामीण भागांमध्ये आधुनिक शस्त्रक्रिया करता येत आहे. हे केवळ वैद्यकीय उपलब्धीच नाही तर ग्रामीण आरोग्यसेवेच्या भविष्याकडे पाहणारा एक महत्त्वाचा पाऊल आहे.
भोकरदन सारख्या तालुक्याच्या ठिकाणी कृत्रिम सांधा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करणे म्हणजे खूप जोखमीचे आणि आव्हानात्मक होते परंतु त्यासाठी संपूर्ण तयारी केली व शस्त्रक्रिया यशस्वी रित्या पार पाडली.

महाराष्ट्र राज्यात ग्रामीण भागांमध्ये जॉइंट रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया करण्याच्या या पुढाकारामुळे हजारो ग्रामीण रुग्णांना आता जालना किंवा औरंगाबादला जाण्याची गरज राहणार नाही. याचा अर्थ असा आहे की ग्रामीण भागातील गरजू रुग्णांना त्यांच्या घराजवळच दर्जेदार आरोग्यसेवा मिळू शकेल

जॉइंट रिपलेसमेंट सारख्या मोठ्या शस्त्रक्रियेसाठी नेहमी जालना किंवा संभाजीनगर ला जाण्याची आता गरज नाही ग्रामीण जनतेच्या, गरजू रुग्णांच्या सेवेसाठी आता भोकरदन मध्ये सर्व सोयी सुविधा उपलब्ध आहेत. व त्या साठी मी कायम तत्पर राहील
- डॉ. कार्तिक रासने ( अस्थिरोग तज्ज्ञ)

32
78 views