logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

शिवसेनेचे आमदार डॉ तानाजी सावंत दोन दिवस सोलापूर दौऱ्यावर

सोलापुर  । शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेनेचे सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख डॉ तानाजी सावंत यांचा बुधवारी आणि गुरूवारी सोलापूर जिल्हयाचा दौरा आयोजित करण्यात आला आहे.

शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातुन पत्रकाव्दारे ही माहिती देण्यात आली आहे. सोलापूर जिल्हयातील कोरोना परिस्थितीचा आढावा तसेच पक्षीय, शासकीय स्तरावर येणा-या अडचणींचा आढावा या दौ-यात घेतला जाणार आहे.

आमदार सावंत यांच्या दौ-याला बुधवारी (दि १२) पंढरपुरातुन सुरूवात होणार असुन, सकाळी ११.३० वाजता शासकीय विश्रामगृहावर ते करमाळा, माढा, माळशिरस, मंगळवेढा, सांगोला आणि पंढरपूर तालुक्यातील शिवसेना पदाधिका-यांची बैठक घेणार आहेत. त्यानंतर दुपारी २ वाजता मोहोळच्या शासकीय विश्रामगृहावर मोहोळ आणि बार्शी तालुक्यातील शिवसेना पदाधिका-यांची बैठक घेण्यात येणार आहे.।

त्यानंतर सोलापूर रेस्ट हऊस येथे सोलापूर शहर, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, अक्कलकोट तालुक्यातील पदाधिका-यांची बैठक घेण्यात येणार आहे.
या दरम्यान शिवसेना नगरसेवक शहर पदाधिकारी तसेच दक्षिण सोलापूर, अक्कलकोट युवासेना अंगीकृत संघटनेचे सर्व पदाधिकारी यांच्या सोबत दुपारी ४ वाजता विश्रामगृह येथे बैठक होणार आहे. या बैठकीत कोवीड जन्य परिस्थितीच्या नियोजन व अडचणी यावर चर्चा होईल.

191
15111 views
10 shares

Comment