logo

महाराष्ट्राचे छत्रपती संभाजी नगर मे विश्व हिंदू परिषद ६१ साल पुरे होने पर बडी धुमाधाम से मनाया गया,

छ. संभाजीनगर दि. -

विश्व हिंदू परिषद म्हणजे सेवा, सुरक्षा आणि संस्कार. हिंदू समाजाच्या संघटनेसाठी कार्य करणाऱ्या विश्व हिंदू परिषदेच्या स्थापनेला ६१ वर्षे पूर्ण झाली, २१ ऑगस्ट १९६४ रोजी, चातुर्मासाच्या पवित्र पर्वकाळात, स्वामी चिन्मयानंद सरस्वती, एस.एस. गोलवलकर (गुरुजी) आणि अनेक संत महात्म्यांच्या मार्गदर्शनाखाली या संघटनेची स्थापना झाली.

संघटनेचे मुख्य उद्देश विश्वातील हिंदू समाजातील समाजात जागृती घडवणे, धार्मिक, सांस्कृतिक मूल्यांचे जतन करणे तसेच समाजातील विखुरलेल्या सर्व घटकांना एकत्र आणणे असा आहे. स्थापनेपासूनच संघटनेचा पवित्रा हा धर्मरक्षण, सेवा, संस्कार आणि संघटन ही मूलभूत तत्व मानून कार्यरत आहे.

स्थापना दिनानिमित्त परिषदेच्या विविध प्रखंडा मध्ये कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. संतांच्या आशिर्वचनांसह हिंदू समाजातील ऐक्य, सामाजिक समरसता आणि सांस्कृतिक अभिमान यांचा संदेश देण्यात आला.

दि - 30 ऑगस्ट रोजी सांयकाळी साडे सहा वाजता महानुभाव आश्रमात छत्रपती संभाजीनगर महामंत्री श्री. अभिषेकजी कादी यांच्या नेतृत्वाखाली वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर महानुभाव आश्रमाचे श्री. सुदर्शन महाराज कपाटे, श्री. संतोष मुनि महाराज, विश्व हिंदू परिषदेचे मुंबई क्षेत्र प्रमुख. मा. श्री संजय अप्पा बारगजे, देवगिरी प्रांत अध्यक्ष श्री संजयजी गायकवाड, मठ मंदिर प्रमुख श्री राजीवजी जहागीरदार, देवगिरी प्रांत उपाध्यक्षा सौ. कुंदा ताई अंदुरे, देवगिरी प्रांत विशेष संपर्क प्रमुख श्री जीवनजी राजपूत, श्री अनिल कोळेकर गुरुजी यांची उपस्थिती होती.

यावेळी बोलताना संजय आप्पा बारगजे म्हणाले की गेल्या सहा दशकान परिषदेने मंदिर, ग्रामसंवाद, गोरक्षा आंदोलन, सेवा प्रकल्प, वनवासी कल्याण, रामजन्मभूमी आंदोलन, हिंदू संघटन इत्यादी चळवळी मध्ये सक्रीय सहभाग घेतला आहे, आज भारतासह जगभरातील ६० हून अधिक देशांमध्ये परिषद कार्यरत असून विविध सेवा प्रकल्पांच्या माध्यमातून समाजकार्य घडवून आणत आहे.

आजच्या जागतिकीकरणाच्या युगात सांस्कृतिक ओळख जपणे, समाजातील समरसता वाढवणे, सेवाकार्यातून दुर्बल घटकांना बळकटी देणे हेच संघटनेचे प्रमुख ध्येय राहणार आहे. स्थापने पासूनच धर्मरक्षण आणि समाजसेवा ही दोन तत्त्वे परिषद मार्गदर्शक मानत आली असून पुढील काळातही या तत्त्वांच्या आधारे कार्य पुढे नेले जाणार आहे.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. शुभम पठाडे तर आभार प्रदर्शन श्री. अथर्व जोशी यांनी मानले.

18
736 views