logo

पनवेलमध्ये धामण प्रजातीच्या ११ पिल्लांचा अंड्यातून उदय वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली पिल्लांची नैसर्गिक अधिवासात मुक्तता .


श्री . वैभव पद्माकर कुलकर्णी , डोंबिवली .

पनवेल, दि. २५ ऑगस्ट २०२५ –
पनवेल बसस्थानकाजवळील स्टड व्हीन इमारतीत दि. ३ जून २०२५ रोजी सरीसृप वर्गातील बिनविषारी प्रजातीचा धामण साप दिसल्याची माहिती स्थानिक रहिवाशांनी नेचर फ्रेन्ड सोसायटी (NFS) पनवेल या संस्थेला दिली. संस्थेचे कार्यकर्ते शार्दूल वारंगे यांनी घटनास्थळी पोहोचून परिसरात शोध घेतला असता साप आढळून आला नाही.

दरम्यान, इमारतीच्या पार्किंग परिसरात तब्बल १४ अंडी आढळून आली. नागरिकांच्या विनंतीनुसार आणि वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली ही अंडी तत्काळ सुरक्षितपणे हटवून NFS पनवेलच्या प्रथमोपचार व पुनर्वसन केंद्रात पुढील देखभालीसाठी ठेवण्यात आली.

या अंड्यांपैकी १५ ते २३ ऑगस्ट २०२५ दरम्यान बिनविषारी धामण सापाची ११ पिल्ली सुरक्षितपणे बाहेर आली.

यानंतर वनविभागाच्या सूचनेनुसार दि. २५ ऑगस्ट २०२५ रोजी संस्थेचे अध्यक्ष संतोष उदरे, कार्यकर्ते बाबू शेख, आर्यन उदरे तसेच वनरक्षक अमोल लाड यांच्या उपस्थितीत या सर्व पिल्ल्यांना पुन्हा नैसर्गिक अधिवासात यशस्वीरीत्या मुक्त करण्यात आले.

या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष संतोष उदरे यांनी सांगितले –

> “धामण हा पूर्णपणे बिनविषारी साप असून तो शेतकऱ्यांचा खरा मित्र आहे. तो शेतीतील उंदीर, घुशी व इतर उपद्रवी प्राणी खाऊन पिकांचे रक्षण करतो. त्यामुळे शेतकऱ्यांना प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची वेळ न येता शेतीचे नुकसान टळते. धामण हा शेतीसाठी अमूल्य सहयोगी आहे.”

📢 नेचर फ्रेन्ड सोसायटी (NFS) पनवेल
सर्पमित्र – वन्यजीव संवर्धनासाठी तत्पर

https://youtube.com/shorts/ZLgdO-ML2f4?si=vZXBtyEj2UABzee7

50
2733 views