
*OBC समाजाच्या हक्कांवर गदा आणण्याचा डाव – पंकज घाटोडे**
*OBC समाजाच्या हक्कांवर गदा आणण्याचा डाव – पंकज घाटोडे*
महाराष्ट्रात आज एक गंभीर राजकीय कट रचला जात आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं या साठी आंदोलन उभारण्यात आलेलं आहे. याला कुणीही विरोध करत नाही, कारण हा त्यांचा हक्कासाठीचा लढा आहे. पण हे आरक्षण वेगळे आरक्षण न देता OBC समाजाच्या कोट्यातून देण्याचा उघड डाव सध्या रचला जातो आहे. असे स्पष्ट दिसत आहे.
पवार साहेब, उद्धव ठाकरे, काँग्रेस, भाजप, अजित पवार, शिंदे गट हे सगळे पक्ष मराठा समाजाला मागून पाठिंबा देताना दिसत आहे. हा पाठिंबा समाजहिताचा नाही, तर OBC समाजाचे शैक्षणिक, राजकीय, शासकीय हक्क संपवण्यासाठीचा खेळ आहे. आज OBC समाज शांत राहिला, तर उद्या आपली पिढी संधीविना वंचित राहील. मराठा समाज आज एकवटला, प्रचंड ताकद दाखवत रस्त्यावर उतरला. मग OBC समाज झोपेत का आहे? आजपर्यंत OBC समाज का बर एकत्र आला नाही कारण OBC समाज आजही विखुरलेला आहे. जातिवादात अडकलेला आहे. छोट्या-छोट्या संघटनांमध्ये विभागला गेला आहे. राजकीय पक्षांच्या मोहजाळात अडकून समाजाच्या हिताऐवजी पक्षनिष्ठा दाखवतो आहे. एकत्र येण्यासाठी ठोस नेतृत्व आणि संघटनशक्ती उभी राहिली नाही. या विखुरलेपणाचा फायदा राजकीय पक्ष घेत आहेत!
आज मंत्रिमंडळात सर्वाधिक प्रतिनिधित्व मराठा समाजाचं आहे, त्यामुळे OBC समाजाचे हक्क हिसकावण्याची तयारी स्पष्ट दिसते. हे फक्त आरक्षणाचं प्रकरण नाही, हा OBC समाजाला राजकीय, सामाजिक, आर्थिकदृष्ट्या मागे ढकलण्याचा कट आहे!
*OBC समाजाने, लक्षात ठेवा*
आरक्षण हा आपला हक्क आहे, आपल्या मुलांच्या भविष्याचा प्रश्न आहे, कुणाच्या पक्षनिष्ठेचा नाही. हा लढा कुठल्याही पक्षासाठी नाही, तो केवळ आपल्या समाजाच्या अस्तित्वासाठी आहे. मराठा समाज जसा एकत्र आला, मोठ्या आंदोलनासाठी उभा राहिला, तसाच OBC समाजानेही आता प्रचंड ताकद दाखवायला हवी. आपल्या हक्कांसाठी एकजूट दाखवा. जातिवाद विसरून एकसंघ व्हा. आरक्षण वाचवण्यासाठी भव्य आंदोलन उभारा. कोणत्याही पक्षाच्या दबावाला झुकू नका.
मी, पंकज घाटोडे, या लेखातून संपूर्ण OBC समाजाला आवाहन करतो, जागे व्हा, संघटित व्हा, हक्कांसाठी लढा! आज नाही उठलो तर उद्या आपलं सर्वकाही नष्ट होईल!
लक्षात ठेवा, हा लढा सत्तेसाठी नाही, आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आहे. आता आपला हक्क वाचवण्यासाठी महाराष्ट्र हादरवून टाका.