logo

चैतन्यनगर शिवमंदिर सभामंडपाचे आज १ ऑक्टोबर रोजी आ. बालाजी कल्याणकर यांच्या हस्ते भुमिपुजन..

.
नांदेड - येथील चैतन्यनगर शिवमंदिर परिसरात उभारण्यात येत असलेल्या भव्य सभामंडपाचा भुमिपुजन सोहळा आज सोमवार दि.01 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी ठिक 11.00 वाजता होणार आहे.

नांदेड उत्तर चे आमदार श्री बालाजी कल्याणकर यांच्या हस्ते सभामंडपाचा भुमिपुजन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. चैतन्यनगर शिवमंदिर नांदेड शहर आणि पंचक्रशीत तसेच जिल्ह्यात सर्वदूर प्रसिद्ध असून श्रावण मासात मोठी गर्दी असते. दर सोमवारी शिव भक्तांनी मंदिर परिसर फुलून जातो. अत्यंत सुंदर आकर्षक असे मंदिर उभारण्यात आले आहे. येथील शंभो महादेवाची पिंड सर्वाच लक्ष वेधून घेते अशी आहे. भक्तांची गर्दी आणि त्यांची दर्शन व्यवस्था याचा विचार करून शिवमंदिर विश्वस्त मंडळाने मंदिर परीसरात भव्य असा सभामंडप होणार असून आज १ ऑक्टोबर रोजी आ. कल्याणकर यांच्या हस्ते सभामंडपाच भुमिपुजन करण्यात येणार आहे. सर्व शिवभक्तांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन शिवमंदिर विश्वस्त मंडळाने केले आहे.

9
735 views