logo

अभ्यास, परिश्रम आणि जिद्द यांचे फळ – सुवर्णा वाघ SET परीक्षेत यशस्वी"

अभ्यास, परिश्रम आणि जिद्द यांचे फळ – सुवर्णा वाघ SET परीक्षेत यशस्वी"

अमळनेर प्रतिनिधी
शिक्षण क्षेत्रातील आपल्या मेहनती व अभ्यासू वृत्तीमुळे लौकिक मिळवलेल्या सौ. सुवर्णा श्रीकांत वाघ, प्राथमिक शिक्षक, जिल्हा परिषद धुळे यांनी सहाय्यक प्राध्यापक पदासाठीची पात्रता परीक्षा – SET (State Eligibility Test) जून 2025 इंग्रजी विषयातून उल्लेखनीय यश मिळवले आहे. त्यांनी 300 पैकी 176 गुण (58.67%) मिळवून पात्रता संपादन केली आहे.
मागील वर्षी पवित्र पोर्टलमार्फत सेमी इंग्रजी शिक्षक म्हणून त्यांची निवड झाली होती व त्यांनी जिल्हा परिषद, धुळे येथे यशस्वीपणे कार्यभार स्वीकारला.
सौ. सुवर्णा वाघ या प्रा. डॉ. दत्तात्रय नामदेव वाघ – प्रताप महाविद्यालयाचे माजी उपप्राचार्य, इतिहास विभाग प्रमुख व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे इतिहास अभ्यास मंडळाचे माजी अध्यक्ष – यांच्या स्नुषा आहेत. तसेच, सौ. अरुणा दत्तात्रय वाघ, लोकमान्य शिक्षण मंडळाची नवीन मराठी शाळा, अमळनेर येथील माजी शिक्षिका, यांच्या सुना असून, त्या सहाय्यक प्राध्यापक श्रीकांत वाघ (झेड. बी. पाटील महाविद्यालय, धुळे) यांच्या पत्नी आहेत.
कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी इंग्रजी विषयात एम.ए. व बी.एड. ही उच्च शिक्षणाची पदवी विशेष प्राविण्यासह मिळवली. तसेच त्यांनी CTET चे दोन्ही पेपर्स (विज्ञान विषयासह प्रथम श्रेणी), TET व TAIT परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण केल्या आहेत. पुढे शैक्षणिक व संशोधन क्षेत्रात मोलाचे योगदान देण्याचा त्यांचा मानस आहे.
त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल धुळे जिल्हा परिषदेतील मान्यवर अधिकारी, पंचायत समिती शिंदखेडा गटशिक्षणाधिकारी मा. श्री. डी. एस. सोनवणे सर, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक करून अभिनंदन केले.
तसेच इंग्रजी विभाग, एस.एस.व्ही.पी.एस कला व वाणिज्य महाविद्यालय धुळे, डी.डी. विसपुते शिक्षणशास्त्र महाविद्यालय, झेड. बी. पाटील महाविद्यालय धुळे, प्रताप महाविद्यालय अमळनेर यांसह अनेक शैक्षणिक संस्थांमधील प्राध्यापक वर्गाचे त्यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले. विशेषत: प्रा. सुधीर एस. पाटील, प्रा. डी. के. सैन्दाणे, प्रा. अनिल महाले या मान्यवर प्राध्यापकांनी त्यांना शुभेच्छा व मार्गदर्शन दिले.
या यशामुळे धुळे जिल्ह्यासह कोल्हापूर जिल्ह्याचाही अभिमान उंचावला असून शैक्षणिक क्षेत्रात नवे आदर्श निर्माण झाल्याचे मान्यवरांनी नमूद केले आहे.


---

45
1553 views